Israel–Hamas War : इस्त्रायल आणि हमास युद्ध तीन महिन्यांनंतरही थांबण्याचं नाव घेत नाहीए. दोन्ही बाजूंकडून हल्ले-प्रतिहल्ले सुरु असून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली आहे. यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फिलिस्तानमध्ये अल जजीराचा Al Jazeera) एक पत्रकार हमासचा सिनिअर कमांडर आहे आणि तो हमासकडून युद्धात सहभागी आहे असा दावा इस्त्रायली डिफेंस फोर्सने (IDF) केला आहे. ज्या पत्रकारावर आरोप करण्यात आला आहे त्या पत्रकाराचं नाव मोहम्मद वाशाह असं आहे. इस्त्रायलने केलेल्या दाव्यानुसार काही आठवड्यांपुर्वी मध्य गाझात केलेल्या कारवाईमधअये मोहम्मद वाशाहचा लॅपटॉपम जप्त करण्यात आला होता.
मोहम्मद वाशाह याच्या लॅपटॉपमध्ये काही फोटो सापडले आहेत. या फोटोंच्या आधारावर वाशाह हमासच्या आर्मी विंगमध्ये सीनिअर कमांडर आहे आणि तो इस्त्रायलविरोधातील युद्धात सहभागी असल्याचं स्पष्ट झालं आहे. इस्त्रायल डिफेंस फोर्सचा प्रवक्ता लेफ्टनंट कर्नल अविचाई आन्द्रे यांनी वाशाहविरोधात ठोस पुरावा सापडल्याचं सांगितलं आहे. मोहम्मद वाशाह नुकताच अल जजीराच्या एका लाईव्ह रिपोर्टींगमध्ये दिसला होता.
लॅपटॉपमध्ये पुरावा
इस्त्रायल सेनेने दिलेल्या माहितीनुसार काही आठवड्यांपूर्वी गाझात हमासच्या एका शिबिरात इस्त्रायल सेनेने एक सर्च ऑपरेशन केलं. यादरम्यान मोहम्मद वाशाहचा लॅपटॉप सापडला. वाशाह हमासच्या टॅकरोधी मिसाईल युनिटचा प्रमुख कमांडर आहे. 2022 मध्ये त्याने आंतकवादी संघटनांसाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंटचं काम सुरु केलं. वाशाहच्या लॅपटॉपमध्ये अनेक हमासच्या कारवायांचे अनेक पुरावे सापडले आहेत. पत्रकारीतेच्या आडून दहशतवादी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा इस्त्रायलने अल जजीराला दिला आहे.
अल जजीराला इशारा
पत्रकाराने निष्पक्ष पत्रकारीता करणं अपेक्षित आहे असं सांगत इस्त्रायलने अल जजीला समज दिली आहे. याआधीही गेल्या महिन्यात राफात इस्त्रायली हवाई हल्ल्यात अल जजीराचे दोन पत्रकार मारले गेले होते. हमास आणि फिलिस्तानी जिहाद सारख्या आंतकवादी संघटनांचे ते सदस्य होते असा दावा इस्त्रायल सेनेने केला होता.
इस्त्रायल-हमात युद्ध
ऑक्टोबर महिन्यात हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायल सैन्यानेही गाझा पट्टीतील हमासच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं. या युद्धात हिज्बुल (Hizbullah) या दहशतवादी संघटनेनं एन्ट्री करत इस्रायलवर हवाई हल्ले केले. गाझा पट्टीतून (Gaza) हमास आणि लेबेनॉनच्या सीमेकडून हिज्बुल्लाह असे हल्ले सुरू झाल्यामुळे इस्रायल एकाचवेळी दोन फ्रंटवर लढाई लढतोय. या युद्धात सैनिकांसह नागरिकांचा बळीही मोठ्या प्रमाणात गेला आहे. तर हजारो लोक जखमी झालेत.