इस्त्राइलचा सीरियात क्षेपणास्त्र हल्ला, २२ जणांचा मृत्यू

इस्त्राइलनं सीरियात केलेल्या क्षेपणास्त्र  हल्ल्याचं जोरदार समर्थन केलंय.

Reuters | Updated: May 11, 2018, 02:51 PM IST
इस्त्राइलचा सीरियात क्षेपणास्त्र हल्ला, २२ जणांचा मृत्यू  title=
छाया - रॉयटर

लंडन : इस्त्राइलनं सीरियात केलेल्या क्षेपणास्त्र  हल्ल्याचं जोरदार समर्थन केलंय. जे आमच्यावर हल्ला करतील, किंवा तशी रणनीती आखतील त्यांच्यावर सातपट तीव्र हल्ला करू असा इशारा इस्राइलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहू यांनी दिलाय.   इस्राइलनं सीरियात केलेल्या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झालाय. बुधवारी रात्री इस्राइल हवाई क्षेपणास्त्रांनी सीरियाच्या दमास्कस शहरावर हल्ला चढवला. यात सीरियातील इराणचे लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. इराणनं इस्राइलच्या उत्तरेतील परिसारवर बॉम्ब वर्षाव केल्यानं हा हल्ला केल्याचं इस्रायलनं प्रत्त्तुतर दिल्याचं स्पष्टीकरण नेतान्याहूंनी दिलाय.