Israel News : लेकीच्या मृत्यूची बातमी ऐकली अन् बाप ओल्या डोळ्यांनी हसला, पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video

Israel Viral Video : इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता एक हृदय पिळवून टाकणारा व्हिडीओ समोर आला असून एक बाप आल्या लेकीच्या मृत्यूनंतर हसताना दिसतोय. (father laughs after hearing the news of his daughter's death)

Updated: Oct 16, 2023, 08:50 PM IST
Israel News : लेकीच्या मृत्यूची बातमी ऐकली अन् बाप ओल्या डोळ्यांनी हसला, पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video title=
Israeli father laughs after hearing the news of his daughter's death

Israel Palestine Conflict : इस्रायलवर आता तीन बाजूंनी हल्ले होताना दिसत आहे. हमाससह हिज्बुल्लाह आणि सीरियानंही इस्रायलवर हल्ले (Israel Hamas War) चढवलेत. लेबनॉन सीमेवरून हिज्बुल्लाहने इस्रायलवर अँटी टँक गाइडेड रॉकेट हल्ले केले. गाझा पट्टी उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायलचे रणगाडे पुढे सरकत असताना हिज्बुल्लाह या दहशतवादी संघटनेनं इस्रायलच्या अनेक भागात बॉम्बने हल्ले केले. या हल्ल्याला इस्रायलनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. इस्रायलच्या रणगाड्यांनी हिज्बुल्लाहचे काही रॉकेटही पाडले. त्यामुळे आता इस्त्रायलमधील नागरिकांचं टेन्शन आणखीच वाढल्याचं चित्र समोर आलं आहे. युद्धामुळे इस्त्रायली लोकांनी सर्वस्व गमावलंय. त्यामुळे इस्त्रायली हतबल झाल्याचं दिसतायेत. अशातच आता एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ (Israel Viral Video) समोर आलाय. ज्यामध्ये एक असहाय्य झालेला बाप आपल्या मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकताच हसू लागला.

इस्त्रायल आणि हमासच्या युद्धात दोन्ही देशातील हजारो लोकांचा मृत्यू झालाय. कुणी लेक गमावला तर कोणी बाप, कोणी सारंच्या सारं कुटुंब गमावलं. त्यामुळे दोन्ही देशातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पहायला मिळाला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती आपल्या वेदना मांडत आहे. थॉमस हँड नावाच्या इस्रायली पिता आपल्या लेकीच्या मृत्यूची माहिती देताना दिसतोय. त्यांची एमिली नावाची मुलगी मृतावस्थेत आढळल्याचं समजताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. त्याचं कारण त्यांनी यावेळी सांगितलंय. (Israeli father laughs after hearing the news of his daughter's death)

माझ्याकडे काही लोक आले अन् त्यांनी मला सांगितलं की तुमची मुलगी एमिली मृतअवस्थेत सापडली आहे, हे ऐकताच माझ्या चेहऱ्यावर हसू फुललं. कारण हमासने मुलीचं अपहरण करुन गाझाला नेलं असतं, तर तिची अवस्था मृत्यूपेक्षाही वाईट झाली असती, असं थॉमस हँड सांगतात. हमासच्या हाती लागण्यापेक्षा मृत्यू बरा, असं एकंदरीत त्यांचं म्हणणं होतं. मुलीच्या मृत्यूची माहिती देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील तरळले. 

पाहा Video

दरम्यान, हमासने इस्त्रायलने हल्ला केल्यानंतर थेट नागरी वस्तीत धावा टाकला. त्यानंतर त्यांनी अनेक इस्त्रायली नागरिकांना मारलं अन् काही महिलांना आणि तरुणींना उचलून गाझामध्ये नेलं होतं. त्यानंतर इस्त्रायली सैन्याने अनेकांची सुटका देखील केली होती. त्यानंतर अनेक अत्याचाराच्या कहाण्या समोर आल्या होत्या. युद्ध नेहमी दु:ख देतो, याची प्रचिती या व्हिडीओमधून मिळू शकते.