अंडरविअरसोबत केले असे काम जगभरात झाला प्रसिद्ध

  प्रसिद्धी मिळण्यासाठी जगभरात कोण कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही. आता हेच उदाहरण बघा.. अंडरविअरचा वापर बहुतांशजण करत असतील पण याच अंडरविअरचा वापर करुन एक इटालियन तरुण जगप्रसिद्ध झाला आहे. त्याच्या नावाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 8, 2017, 07:26 PM IST
अंडरविअरसोबत केले असे काम जगभरात झाला प्रसिद्ध  title=

इटली :  प्रसिद्धी मिळण्यासाठी जगभरात कोण कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही. आता हेच उदाहरण बघा.. अंडरविअरचा वापर बहुतांशजण करत असतील पण याच अंडरविअरचा वापर करुन एक इटालियन तरुण जगप्रसिद्ध झाला आहे. त्याच्या नावाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.

सिल्वियो सब्बा असे या तरुणाचे नाव असून केवळ ३० सेकंदात १३ अंडरवियर घालून आपले नाव नोंदवले आहे. या कारनाम्याचा व्हिडिओ युट्यूबवर जोरदार व्हायरल होत आहे. या तरुणाचा अंडरविअर घालण्याचा अंदाज काही औरच आहे असे यातून दिसून येते.सिल्वियो सबा नावाचा हा तरुण इटलीतील रोडान शहरात राहतो. हा रेकॉर्ड बनविण्यासाठी त्याने टेबलवर सर्व अंडरवेअर ठेवल्या.

 

त्यानंतर त्यातील एक-एक अंडरवेअर परिधान करु लागला. तो अशा पद्धतीने हे काम करत होता की अंडरविअर थेट त्याच्या पायातच जात होती. काही वेळाने त्याचे हे तंत्र नाकाम होतेय असे वाटू लागले. पण तरीही रेकॉर्ड तयार करण्यात तो यशस्वी ठरला आहे. त्याचे हे काम क्षुल्लक वाटत असले तरीही जगभरात त्याने नाव कमावले आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवल्यानंतर लोकांनी त्याला शोधण्यास सुरूवात केली आहे. ३० सेकंदात १३ अंडरवियर घातल्याच्या रेकॉर्डनंतर आता त्याने निश्वास टाकला आहे.