भयंकर! घर मिळवण्यासाठी 10 वर्ष फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह
घरावर ताबा मिळवण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा काही नेम नाही.
Updated: Jan 30, 2021, 05:18 PM IST
नवी दिल्ली: घरावर ताबा मिळवण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा काही नेम नाही. आतापर्यंत आपण घरात भांडण लावलेली किंवा हत्येपर्यंत प्रकरण गेल्याचं ऐकलं असेल. घराचा ताबा मिळवण्यासाठी एक धक्कादायक प्रकार केल्याची घटना समोर आली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. एका महिलेनं आपल्या आईचा मृतदेह तब्बल 10 वर्ष जपून ठेवला आहे.
जेव्हा या घटनेची कुणकुण आजूबाजूच्या नागरिकांना लागली तेव्हा त्यांनी घरात घुसून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी महिलेची विचारपूस केल्यानंतर आश्चर्यकारक कारण समोर आलं. ज्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जपानमधील स्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार या महिलेनं आपल्या आईचा मृतदेह फ्रीजमध्ये 10 वर्षांपासून लपवून ठेवला होता. योशिनो असं या महिलेचं नाव आहे. या महिलेला कोणी घरातून बाहेर काढू नये म्हणून तिने हा प्रकार केल्याची माहिती मिळाली आहे.
जेव्हा या महिलेच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर या घरावर ताबा मिळवण्यासाठी नगर निगमची टीम घटनास्थळी दाखल झाली. जानेवारी महिन्यात त्यांनी या महिलेला घर रिकामं करण्यासाठी सातत्यानं तगादा लावून धरला. तर एका क्लिनरने ही शवपेटी शोधून काढली आणि हा सगळा भयंकर प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना जपानमध्ये घडली आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link