Job QUIT: तरुणाने नेटफ्लिक्समधील 3.5 कोटींच्या पॅकेजची नोकरी सोडली, कारण काय तर...

तरुणाच्या कुटुंबीयांना त्याच्या निर्णयाचं आश्चर्य वाटलं,  त्यांना वाटलं याला वेड लागलं आहे, पण... 

Updated: Jun 7, 2022, 08:59 PM IST
Job QUIT: तरुणाने नेटफ्लिक्समधील 3.5 कोटींच्या पॅकेजची नोकरी सोडली, कारण काय तर... title=

Job QUIT: करोडो रुपयांचा पगार,  कार, घर आणि पाहिजे तेव्हा सुट्टी, अशी नोकरी कोणाला नको असेल. मात्र काही वेळा असं दिसून आलं आहे की या गोष्टीही काही वेळा त्या व्यक्तीला आनंद देऊ शकत नाहीत. असंच एक प्रकरण अमेरिकेतून समोर आलं आहे. 

मायकल लिन नावाचा तरुण नेटफ्लिक्स कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होता. आता त्याने ही नोकरी सोडली आहे. लिनने करोडो रुपयांचं पॅकेज आणि सुविधा सोडून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. 

नोकरी सोडल्यानंतर मायकेल लिनने लिंक्डइनवर माहिती शेअर केली. नेटफ्लिक्समध्ये रुजू झाल्यावर आता इथेच अनेक वर्ष नोकरी करण्याचं लिनने ठरवलं होतं. त्याला कंपनीत कोणतीही अडचण नव्हती. वार्षिक 3.5 कोटी पगार, अमर्यादित सुट्टी आणि हवं ते जेवणं कंपनीकडून त्याला मिळत होतं. पण या नोकरीला त्याने सोडचिठ्ठी दिली.

लिनच्या निर्णयाचं कुटुंबियांना आश्चर्य
लिनच्या या निर्णयाचं सर्वाधिक आश्चर्य वाटलं ते त्याच्या कुटुंबियांना. त्यांना वाटले लिन वेडा झाला आहे का?. लिनच्या मेंटॉरनेही त्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दुसरी नोकरी नसताना नोकरी सोडणं योग्य नाही, असं सर्वांनी त्याला समजावलं. पण यानंतरही लिन नोकरी सोडण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिला.

लिनने का सोडली नोकरी
लिनने इतक्या मोठ्या पगाराचा नोकरी का सोडली याबाबत त्याने एक पोस्ट लिहिली आहे. नोकरी सोडण्याचा निर्णय हा आपल्यासाठी सोपा नव्हता असं त्याने म्हटलं आहे. नेटफ्लिक्समध्ये काम करताना त्याला खूप काही शिकायला मिळालं. मात्र, कोरोनाच्या कालावधीनंतर सर्वच गोष्टींचा त्याला कंटाळा येऊ लागला. लिनच्या आयुष्यात तोच तोचपणा आला होता. 

लिनच्या मते त्याचं अभियांत्रिकी शिक्षण हे काही तरी करुन दाखवण्यासाठी होतं. नेटफ्लिक्समध्ये दोन वर्ष नोकरी केल्यानंतर त्याने इतर कंपन्यांमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून प्रयत्न केला. पण त्याला कुठेही यश आलं नाही. याचं मुख्य कारण होतं, त्याचा गलेलठ्ठ पगार. नेटफ्लिक्समधल्या मोठ्या पगाराच्या नोकरीमुळे त्याला इतर कंपन्यांमध्ये नोकरी मिळत नव्हती. 

लिनला ही नोकरी सोडल्याचा पश्चाताप झाला असेल, असं सगळ्यांना वाटलं असेल. मात्र त्याला त्याची पर्वा नाही. नोकरी सोडल्यानंतर लिनने अनेक निर्माते, लेखक आणि उद्योजकांशी भेटी घेतल्या. यानंतर आता लिनने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.