Good Bye Ma, म्हणतं मुलाने आईला 'अशी' वाहिली श्रद्धांजली

कोविडमुळे आई-मुलाची ताटातूट 

Updated: Apr 13, 2021, 02:47 PM IST
Good Bye Ma, म्हणतं मुलाने आईला 'अशी' वाहिली श्रद्धांजली  title=

मुंबई : कोरोनाचा उद्रेक जगभरात वाढत आहे. कोरोना व्हायरस (Corona Virus) माणसाला माणसापासून दूर करत आहे. कोरोनामुळे एक मुलगा आपल्या आईपासून दूरावला आहे. मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या सर्वेसर्वा पद्मश्री फातेमा झकेरिया यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा फरीद झकेरिया (Journalist Fareed Zakaria) अमेरिकेत पत्रकार म्हणून अमेरिकेत कार्यरत आहे. 

आईच्या निधनाची बातमी कळल्यानंतरही मुलाला अंत्यसंस्कारासाठी भारतात येता आले नाही. जगातील नावाजलेल्या पत्रकारापैकी एक असलेल्या या पत्रकार मुलाने आईच्या मृत्यूची बातमी दिली. या बातमीच्या अखेरीस मुलगा भावूक झाले. 

कोण आहेत फातेमा झकेरिया? 

औरंगाबादच नाही तर देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात फातेमा झकेरिया यांचे नाव घेतले जाते. मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये देशभरातीलच नाही तर विदेशी विद्यार्थी देखील शिक्षण घेतात. शिक्षणाची गुणवत्ता आणि शिस्त यावरुनही या महाविद्यालयाची ओळख आहे. देशातील नावाजलेल्या पत्रकारांमध्ये फातेमा झकेरिया यांचेही एक नाव होते. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

वडील राजकारणी आणि आई पत्रकार अशा दोघांच्या सानिध्यात तयार झालेल्या या पत्रकार मुलाने आपल्या आईला भावनिक निरोप दिला. फातेमा झकेरिया यांचा जीवनप्रवास उलगडत असतांना फरीद यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणींना देखील उजाळा दिला. सध्याच्या कोरोना काळात आपल्या आईला गमण्याचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते.