Viral News : ती जज-तो गुन्हेगार..! दोन Ex Classmate ची जेव्हा भेट होते...Video इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ

Judge Criminal Courtroom Video : कोर्टरुममधील एक व्हिडीओ जगभरात धुमाकूळ घालतोय. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेली महिला आणि गुन्हेगाराच्या जागी उभा असलेला तो शाळेतील मित्र अन् मग...

नेहा चौधरी | Updated: Oct 7, 2023, 08:37 PM IST
Viral News : ती जज-तो गुन्हेगार..! दोन Ex Classmate ची जेव्हा भेट होते...Video इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ title=
Judge criminal former classmates meeting courtroom viral video criminal life changed moment Internet viral news trending now

Judge Criminal Courtroom Video : जग गोल आहे कोण कधी कुठे भेटेल याचा नेम नाही. याचा अनुभव तुम्हाला कधी ना कधी आला असेल. जेव्हा लहानपणी शाळेतील मित्र किंवा मैत्रिणी आयुष्याच्या एका टप्प्यात अचानक समोर येते तेव्हा जग किती लहान आहे, याची प्रचिती येते. आज सोशल मीडियामुळे अगदी केजीमध्ये एकत्र शिकणारे मुलं मुली अनेक वर्षांनंतर एकमेकांच्या संपर्कात आली आहे. बालपणाच्या अशा अनेक गोष्टी आणि चेहरे असतात ज्यांच्या बदल आपल्याला धुसर आठवतं. 

एक जज-दुसरा गुन्हेगार..! 

आपल्या बालपणीचे खूप कमी मित्र किंवा मैत्रीण आपल्यासोबत असते. पण काही तर आपल्या फक्त मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी हरवलेले असतात. सोशल मीडियावर अशीच एक दोन बालपणीच्या मित्रांची भावूक कहाणी व्हायरल झाली आहे. या दोघांची भेटही अशा ठिकाणी झाली की आपण स्वप्नातही विचार करणार नाही. एखाद्या चित्रपटाचा सीन वाटावा असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

बिछड़ा यार मिला..!

ही कहाणी आहे आर्थर बूथ आणि मिंडी ग्लेजरची...हे दोघे बालपणी एकाच शाळेत शिकले. आर्थरला लहानपणापासून न्यूरोसर्जन व्हायचं होतं. तो गणित आणि विज्ञानात खूप हुशार होता. तर मिंडीही खूप हुशार तिला मोठ्यापणी पशुवैद्य बनायचं होतं. पण ती मोठी झाली आणि तिने वकील होण्याचं ठरवलं. ती लॉ स्कूलमध्ये गेली आणि एक सर्वोच्च वकील बनली. दोघांनी करिअरसाठी वेगवेगळे मार्ग निवडलं आणि ती शाळेतील त्यांची शेवटची भेट होती. 

अन् मग एकेदिवशी ते दोघे पुन्हा एकमेकांच्या समोर आले. आता काळ खूप लोटला होता, ते दोघेही अनेक वर्षांनंतर एकमेकांच्या समोर आले होते. ही भेट अशी होणार त्या दोघांनीही कधी विचार केला नव्हता. नेहमी प्रमाणे मिंडी न्याय करण्यासाठी न्यायाधीक्षाच्या खुर्चीवर बसली. आजचा दिवस तिच्यासाठी अस्मरणीय असेल असा तिने कधी विचारही केला नसेल. गुन्हेगाराच्या जागी उभा असलेला मिंडीला ती पाहून आश्चर्यचकित झाली. 

ती कसलाही विचार न करता त्याला पाहून म्हणाली की, तू तोच आहेस त्या ज्याच्यासोबत मी फुटबॉल खेळायची. पण तू इथे कसा? या दोघांमधील विचित्र भेटीचा क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

ज्या मुलाला लहानपणी न्यूरोसर्जन व्हायचं होतं तो आज गुन्हेगाराच्या कठड्यात उभा होता. तिला प्रश्न पडला हे असं कसं झालं. तर आर्थरला जुगार आणि ड्रग्जचे व्यसन जडलं होतं. त्या व्यसनातून त्याने अनेक घरफोड्या केल्या होत्या. तो अनेक वेळा पोलिसांच्या हातूनही निसटला. पण एकदा तो रंगेहात पकडल्या गेला. त्याला शिक्षे सुनावण्यासाठी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्या कठड्यात उभं असूनही त्याला त्याच्या कृत्याबद्दल कुठलाही पश्चाताप दिसत नव्हता. 

पण ज्यावेळी न्यायाधीश आणि लहानपणीची मैत्री मिंडीने त्याला विचारलं की तू नॉटिलस मिडल स्कूलमध्ये शिकत होता का? हे ऐकून तो ढसाढसा रडू लागला. तो तिच्या त्या प्रश्नाने पूर्णपणे कोसळला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लहानपणीचे एकत्र शाळेत शिकणारे ते दोघे आयुष्यात कुठे पोहोचले हे दाखविणारा आहे. एकाने मेहनतीने आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि आज न्यायाधीक्ष पदावर विराजमान झालं. तर दुसरा वाईट वाटेवर गेल्यामुळे गुन्हेगाराच्या कठड्यात येऊ थांबलं. 

49 वर्षांचा आर्थर न्यायाधीक्ष मिंडीचा Ex Classmate होता. आर्थरने शाळा सोडल्यानंतर ते दोघे पहिल्यांदाच भेटत होते. 1980 मध्ये तो शाळेतून बाहेर पडला. त्यानंतर मियामी बीच हायस्कूलमधून त्याने अकरावी केली. त्याच वेळी त्याला सट्टेबाजीचं व्यसन लागलं आणि तिथून त्यांचं आयुष्य उद्धवस्त झालं. त्याने पैशांसाठी घरं आणि गोदाम फोडून चोरी करायला सुरुवात केली.

आर्थरचं अर्ध आयुष्य हे तुरुंगात गेलं आहे. ड्रग्ज आणि बेटिंगच्या व्यसनातून तो गुन्हेगारीच्या जगात आला. कमी वेळात जास्तीत जास्त पैसे मिळवण्याचा नादात तो आज गुन्हेगार झाला होता. तो 17 वर्षांचा होता तेव्हा पहिल्यांदा तुरुंगात गेला होता. तो व्यसनाच्या आहारी गेला नसता तर तो आज नक्कीच चांगल्या पदावर असता, असं त्यांच्या कुटुंबियाचं म्हणं आहे. कुटुंबाने त्याला यातून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले पण तो या जाळ्यातून बाहेर न निघता अजून त्या जाळ्यात अडकत गेला. 

मिंडीच्या शब्दांनी आयुष्याला मिळाली कलाटणी

हे दोघे जवळपास 15 वर्षांनंतर म्हणजे 2015 मध्ये कोर्ट रुममध्ये एकमेकांच्या समोर आले होते. ही भेट एकमेकांसाठी धक्कादायक होती. त्यात मिंडीच्या त्या प्रश्नाने तुम्हाला तोडून टाकले होते. त्याला समजलं होतं आपण आयुष्यातील बरीच वर्षे वाया घालवली आहेत. त्याने अनेकांना निराश केलंय. मिंडी त्याला म्हणाली, हा मिडल स्कूलमधील सगळ्यात चांगला मुलगा होता. मी त्याच्यासोबत फुटबॉल खेळायची...आणि बघा आज काय झालंय. मिंडीच्या या वाक्याने आर्थरला पश्चाताप झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. आता त्याला सुधारायचं होतं. 

त्याला 10 महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. न्यायालयीन कार्यक्रमांतर्गत त्यांची लवकर सुटका झाली. पण आता सगळं बदलं होतं. कोर्ट रुममध्ये भेटलेला आर्थर आता तो नव्हता. त्याने तुरुंगात असताना भरपूर पुस्तकं वाचली होती. त्याला व्यवसायात रस निर्माण झाला. त्याने आयुष्याकडे नव्याने पाहण्याचं ठरवलं होतं. 

तो ज्या दिवशी तुरुंगातून बाहेर आला त्यावेळी त्याच्या कुटुंबासोबत मिंडीही तिथे होती. तिने आर्थरला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानेही ड्रग्ज आणि सट्टेबाजीपासून दूर राहण्याचं वचन दिलं. ''मिंडी माझ्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी व्यक्ती आहे. मिंडी अविश्वसनीय आहे.''

खरं तर हा कोर्टरुमचा व्हिडीओ व्हायरल होऊन 6 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण त्या एका घटनेने आर्थरच्या आयुष्याला नवीन वळण दिलं. तो आता एका फार्मास्युटिकल कंपनीचा व्यवस्थापक आहे. शिवाय Ex Classmate आणि बालपणीची मैत्री मिंडीला दिलेल्या वचनाच तो काटेकोरपणे पालन करत आहे. 

बघा ना तो एक क्षण आणि ते एक व्यक्ती आपल्या आयुष्याला कसं वळणं देईल कोणीही सांगू शकतं नाही. म्हणून म्हणतात प्रत्येकाची भेट ही ठराविक वेळा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे होत असते. फक्त ते कारणं आपल्याला गवसलं पाहिजे.