Kabul Attack: अमेरिकेने दिला गंभीर इशारा; ISISचा बदला घेणार, ज्यो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया

Kabul Airport Blast : दहशतवादी (Kabul Attack) हल्ल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या इस्लामिक स्टेटला (ISIS) गंभीर परिणामासाठी (Terrorist Attack) तयार राहा, असा स्पष्ट इशारा दिला आहे.  

Updated: Aug 27, 2021, 06:57 AM IST
Kabul Attack: अमेरिकेने दिला गंभीर इशारा; ISISचा बदला घेणार, ज्यो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया title=

वॉशिंग्टन: Kabul Airport Blast : काबूल विमानतळावरील दहशतवादी (Kabul Attack) हल्ल्यानंतर अमेरिका प्रचंड संतप झाली आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या इस्लामिक स्टेटला (ISIS) गंभीर परिणामासाठी (Terrorist Attack) तयार राहा, असा स्पष्ट इशारा दिला आहे. या हल्ल्यात अमेरिकन सैनिक आणि सामान्य अफगाणांच्या मृत्यूबद्दल ज्यो बायडेन अत्यंत भावनिक झालेत. बायडेन म्हणाले की, ISISला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. ही जखम आम्ही विसरणार नाही. आम्ही प्रत्येक दहशतवादी शोधून काढू आणि त्यांना वेचून ठार मारू, असे ते म्हणाले.

काबूल विमानतळावर तिसरा बॉम्बस्फोट, 10 अमेरिकन कमांडोंसह 64 ठार

अध्यक्ष बायडेन झाले भावूक 

'मिरर'च्या वृत्तानुसार, गुरुवारी काबूल विमानतळावर एकापाठोपाठ तीन स्फोट झाले. (Kabul Airport Blast) या हल्ल्यात 10 अमेरिकन कमांडोंसह 64 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. ISIS या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ज्यो बायडेन यांनी काबूल हल्ल्यानंतर देशाला संबोधित करताना ISISचा बदला घेण्याची शपथ घेतली. यादरम्यान ते भावूकही झाला. त्यांनी प्रथम शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर दहशतवादी संघटनेच्या विरोधात मोहीम जाहीर केली.

'या मृत्यूंची मोठी किंमत मोजावी लागेल' 

बायडेन यांनी ISISला स्पष्ट शब्दात बजावले आहे, 'आम्ही माफ करणार नाही. ही जखम आम्ही विसरणार नाही. आम्ही दहशतवाद्यांचा शोध घेऊ आणि त्यांना वेचून ठार करू आणि त्यांना या मृत्यूंची किंमत मोजावी लागेल. या हल्ल्याला अफगाणिस्तानातील अमेरिकेचा सर्वात वाईट दिवस असल्याचे सांगत अमेरिकन अध्यक्ष बायडेन म्हणाले की, ज्यांनी निरपराध लोकांना मारले त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. काबूल विमानतळावर अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिक अजूनही उपस्थित आहेत. 31 तालिबानने बचाव कार्य पूर्ण करण्यासाठी 31 ऑगस्टची मुदत दिली आहे. असे असताना त्यांनी परदेशी सैनिकांनी 31 पर्यंत देश सोडला नाही तर ते चांगले होणार नाही, हे म्हणणे चुकीचे आहे.

बचावकार्य थांबणार नाही - अमेरिका 

तालिबानने अंतिम मुदत निश्चित केली असेल, परंतु बचावकार्य (Rescue Operation) सुरूच राहील, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. बायडेन म्हणाले की, आम्ही अमेरिकन नागरिकांची अफगाणिस्तानातून सुटका करू. आम्ही आमच्या अफगाण मित्रांना बाहेर काढू आणि आमचे ध्येय पुढे चालू राहील. ते पुढे म्हणाले की, काबूल विमानतळाबाहेर झालेल्या हल्ल्यात ठार झालेले अमेरिकन सेवा सदस्य हे हिरो होते. ते इतरांचा जीव वाचवण्यासाठी एका धोकादायक मिशनमध्ये गुंतले होते. त्याचवेळी, इसिस-के (ISIS-K) या दहशतवादी गटाने काबूल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी तसे आपल्या टेलिग्राम अकाऊंटवर म्हटले आहे.