बॉम्बस्फोटानं हादरलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पाहा कुठे घडलीय घटना

बॉम्बस्फोटानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा नेमकी कुठे घडलीय ही घटना

Updated: Jul 29, 2022, 07:27 PM IST
बॉम्बस्फोटानं हादरलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पाहा कुठे घडलीय घटना

काबुल: आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार क्रिकेट ग्राऊंडमध्ये हा स्फोट झाला. अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये ही घटना घडली आहे. घटनास्थळावर अजूनतरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही. 

क्रिकेट स्टेडियमवर बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे. शपीजा क्रिकेट लीगचा आठवा हंगाम १८ जुलैपासून सुरू झाला. शुक्रवारी, लीगचा 21 वा सामना आमो शार्क आणि स्पिन घर टायगर्स यांच्यात खेळवण्यात आला. ज्यामध्ये स्पिन घर टायगर्सने विजयासाठी 135 धावांचे लक्ष्य 7 विकेट्स शिल्लक असताना पूर्ण केले.

बॉम्ब स्फोटानंतर सर्व खेळाडूंना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यात आलं आहे. स्टेडियमवर हल्ला झाला तेव्हा तेथे संयुक्त राष्ट्राची एक व्यक्ती उपस्थित होती, जी मुलाखतीसाठी तिथे पोहोचली होती असं सांगण्यात आलं आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x