मेगेन मार्कलच्या ड्रेसवर टीका करणार्‍यांना कॅटचं प्रत्युत्तर !

मेगन मार्कल आणि प्रिंस हॅरी यांच्या विवाहानंतर आता मेगन हळूहळू शाही परिवारात रूळायला लागली आहे.

Updated: Jun 13, 2018, 11:44 AM IST
मेगेन मार्कलच्या ड्रेसवर टीका करणार्‍यांना कॅटचं प्रत्युत्तर !

लंडन : मेगन मार्कल आणि प्रिंस हॅरी यांच्या विवाहानंतर आता मेगन हळूहळू शाही परिवारात रूळायला लागली आहे. मूळची अमेरिकन मेगन लग्नानंतर शाही राजघराण्याच्या नियमांसोबत स्वतःला जुळवून घेत आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये मेगनने ऑफ शोल्डर ड्रेस घातल्याने नेटकरांनी टीकेची झोड उठवली होती. 

मेगनच्या टीकाकारांना कॅटचं प्रतिउत्तर  

शाही परिवारात कपडे, सार्वजनिक  वर्तणूक याबाबत अनेक कडक नियम आहेत. मेगनने एका कार्यक्रमामध्ये ऑफ शोल्डर गाऊन घातल्यानंतर  होणार्‍या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी कॅट मिल्टन तिच्या पाठीशी उभी राहिली. 

कॅट काही दिवसांपूर्वी मुलगी शॅरलेट, मुलगा प्रिंस आनि पती विल्यम सोबत फिरायला गेली होती. यावेळी कॅटने निळ्या-पांढर्‍या रंगाचा गाऊन घातला होता. या वेळेस कॅटने मुलांसोबत धम्माल मस्ती केल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  

 

 

Running and jumping on wedges while still looking good? No problem said Kate.  While Charlotte and George had great fun playing around, Mummy Kate was busy watching them.  (Outfit rewind: The light blue dress is from ZARA, her white bag is by Victoria Beckham and her wedges are Russell & Bromley called "Coco-Nut") Check out my last posts for more adorable photos!  • • • • • #KateMiddleton #CatherineMiddleton #DuchessofCambridge #PrinceWilliam #DukeofCambridge #PrinceHarry #dukeofsussex #PrinceCharles #QueenElizabeth #PrincessDiana #PrinceGeorge #PrincessCharlotte #PippaMiddleton #BuckinghamPalace #KensingtonPalace #royals #Britishroyals #royalfamily #Britain #Uk #England #Cambridge #MeghanMarkle #duchessofsussex

A post shared by Kate Middleton (@duchesscatherineofbritain) on

कॅट सुट्टीवर 

प्रिंस लुईस हा कॅट आणि विल्यमचा तिसरा मुलगा आहे. दीड महिन्याच्या या बाळासाठी सध्या कॅट मॅटर्निटी लिव्हवर आहे. काही महिन्यांनी राजकीय कामांमध्ये कॅट विल्यमला साथ देईल. मात्र दरम्यान मेगनला नव्या संस्कृतीशी जुळवून घेण्यासाठी मेगन मदत करत आहे.