सुळक्यावर घर... मॅक्झीम आजोबांचं हटके वैराग्य!

गेल्या २५ वर्षांपासून मॅक्झिम आजोबा या सुळक्यावर एकटेच राहतात

Updated: Jun 19, 2019, 12:15 PM IST
सुळक्यावर घर... मॅक्झीम आजोबांचं हटके वैराग्य! title=

मुंबई : संन्याशाला साधनेसाठी एकांत हवा असतो. संन्याशी दाट जंगलात जाऊन सन्यस्त आयुष्य जगतात. युरोपातल्या जॉर्जिया देशात मॅक्झीम नावाच्या माणसानं सन्यास घेतला. संन्यास घेतलेल्या मॅक्झीम यांनी सन्यस्त आयुष्य जगण्यासाठी जी जागा निवडली ती जागाच खास आहे. त्यांच्या आश्रमामुळे त्यांची जगभर ओळख झालीय. जॉर्जिया या देशातल्या आकाशाला भिडलेल्या आणि मुख्य पर्वत रांगेपासून वेगळा झालेल्या सुळक्यावर हा वैरागी राहतोय. 'कात्सखी सुळका' म्हणून या सुळक्याला संबोधलं जातं. १३० फुटांचा हा सुळका कोणत्याही गिर्यारोहकाला गिर्यारोहणासाठी खुणावेल. गिर्यारोहण करणं तिथं काही क्षण थांबून उतरणं एवढ्यापर्यंत ठिक आहे. मॅक्झीम नावाच्या वैराग्याला मात्र हे ठिकाण एवढं आवडलं की त्यांनी या सुळक्यावरच तळ ठोकलाय.

Related image
कात्सखी सुळक्यावरचे मॅक्झीम आजोबा

१९९३ पासून म्हणजे गेल्या २५ वर्षांपासून मॅक्झिम आजोबा या सुळक्यावर एकटेच राहतात. या सुळक्यावर छान असं घर बांधलंय. हे घर दिसायला आकर्षक नसलं तरीही राजाच्या राजमहालाला लाजवणारी शान या घराला लाभलीय. 

घर सामान्य असलं तरी आकाशात या घराला कोणाचीच स्पर्धा नाही. या सुळक्यावर जाण्यासाठी काही शिड्या आहेत. या शिड्यांवरुन मॅक्झीम आजोबा कधीतरी खाली उतरतात.

Image result for rock Katskhi Pillar Monk
कात्सखी सुळका

पूर्वायुष्यात व्यसनी असलेल्या मॅक्झीम आजोबांनी सगळ्याचा त्याग करून या सुळक्यावरच राहणं पसंत केलं. आता ते एक अध्यात्मिक पंथाचे प्रमुख आहेत. त्यांचे अनुयायी या कात्सखी सुळक्यावर येतात. त्यांच्यासोबत काही क्षण व्यतीत करतात. 

मॅक्झीम आजोबांच्या या साध्या राहणीचा कुणालाही हेवा वाटावा... जॉर्जियाच्या पर्वतरांगामधील आजोबांची राहणी जगावेगळी म्हणावी लागेल.