Maharashtra Weather: राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. पुणे आणि रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता तर नाशिक, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता.उर्वरित महाराष्ट्राला यलो अलर्ट देण्यात आला होता.हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळला. सकाळपासून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला. आता उद्या काय होणार? याची चिंता नागरिकांना आहे. हवामान खात्याने उद्या 26 सप्टेंबर रोजीचा अंदाज व्यक्त केला आहे.
मुंबईला उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट आहे. मुंबईभर पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उद्या मुंबई, ठाणे, रायगड साठी ऑरेंज अलर्ट जरी. तर पालघरसाठी उद्या देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे स्टेशनवर आणि परिसरात पाणी साचलंय..त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरूये..अर्धा तास वीजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे कल्याणमधील नागरिकांचे प्रचंड हाल झाले.मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे. पावसामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरची वाहतूक विलंबाने होतेय. लोकल गाड्या १० ते १५ उशिरानं धावत आहेत. यामुळे ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.
मुसळधार पावसानं आज पुण्याला अक्षरश: झोडपून काढलंय.. हवामान खात्याकडून पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय..पुण्यातील चारही प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत वाढ झालीये.पुण्यात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय.. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं रुप आलंय.. नवी पेठ रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याच चित्र आहे.पुणे शहरातील घोरपडीतील कवडे रोडवर महापालिकेच्या अग्निशमन केंद्र समोरील रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलं आहे. त्यामुळे या रस्त्यावरून पायी चालत जाणे अवघड झाले आहे.उत्तर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरातही झालेल्या मुसळधार पावसाने पालेभाज्यांच्या रोपवाटिकेंच मोठं नुकसान झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात ते सभा घेणार आहेत, पण या सभेवर पावसाचं सावट आहे. मुसळधार पावसानं आज पुण्याला अक्षरश: झोडपून काढलंय. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं रुप आल्याचं पहायला मिळतंय. नवी पेठ रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं पहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी टाकलेली माती पावसामुळे वाहून गेलीये.
कल्याणमध्येही मुसळधार पावसामुळे रेल्वे स्टेशनवर आणि परिसरात पाणी साचलंय त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरूये..अर्धा तास वीजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे कल्याणमधील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. तर बदलापुरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. सानेवाडी, कात्रप, स्टेशन बाजारपेठ, मांजर्ली, रमेश वाडी, सानेवाडी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे नागरिक आणि वाहन चालकाना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागतेय. अनेक दुचाकी, कार पाण्याखाली आल्यात.