बैरूत: लेबनॉनची राजधानी बैरूत येथे मंगळवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता खूपच जास्त असल्याने यामध्ये शेकडो लोकांचा बळी गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर या स्फोटाच्या अनेक क्लीप्स व्हायरल होत आहेत. या स्फोटाचे नेमके कारण आणि जीवितहानीचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.
सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या क्लीप्समध्ये दुरुनही स्फोटाची प्रचंड तीव्रता लक्षात येत आहे. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या सर्व वस्तू बेचिराख झाल्याची शक्यता आहे. तर आजुबाजूच्या परिसरातील घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरलं. शहरांमधल्या अनेक रस्त्यांवर धुराचे लोट पाहण्यास मिळाले.
Moment that the second explosion hit #Beirut Lebanon. Many houses damaged, injuries reported.
First was at Port. This is closer to downtown pic.twitter.com/6DdmgQFriD
— Joyce Karam (@Joyce_Karam) August 4, 2020
स्थानिक प्रसारमध्यामांच्या माहितीनुसार, बैरूत बंदराच्या परिसरात हा स्फोट झाल्याचे समजते. येथे अनेक गोदामे आहेत. या घटनेनंतर लेबनॉनमध्ये राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, लेबननमध्ये असणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासाने मदतीचे फोन क्रमांक दिले आहेत. या परिस्थितीत सगळ्यांनी शांत राहावं, असं आवाहनही करण्यात आहे.