जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १.८ कोटींच्या पार; लाखो जणांचा मृत्यू

जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीने ही आकडेवारी जारी केली आहे.

Updated: Aug 3, 2020, 03:57 PM IST
जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १.८ कोटींच्या पार; लाखो जणांचा मृत्यू
संग्रहित फोटो

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना रुग्ण संख्येने 1.8 कोटींचा आकडा पार केला आहे. तर जगभरात एकूण 6 लाख 87 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीने ही आकडेवारी जारी केली आहे.

यूनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजिनिअरिंगने (CSSE) सोमवारी सकाळी जगभरातील एकूण आकड्यांचा खुलासा केला आहे. CSSEने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आतापर्यंत 18,002,567वर पोहचली आहे. तर मृतांचा आकडा 6,87,930 इतका झाला आहे.

CSSEनुसार, अमेरिका कोरोना रुग्ण संख्येत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत सर्वाधिक 46,65,932 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 154,841 जण कोरोनामुळे दगावले आहेत. तर ब्राझील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये 2,733,677 कोरोनाग्रस्त असून आतापर्यंत 94,104 जणांचा बळी गेला आहे. 

जगभरात कोरोना रुग्ण संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात आतापर्यंत 17,50,723 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 37,364 जण दगावले आहेत.

भारतानंतर रशियाचा क्रमांक असून तेथे 849277 कोरोनाग्रस्त आहेत. 
त्यानंतर दक्षिण अफ्रिका 511,485, 
मेक्सिको 439,046, 
पेरू 422,183, 
चिली 359,731, 
ईरान 309,437, 
ब्रिटेन 306,317, 
कोलंबिया 306,181, 
स्पेन 288,522, 
पाकिस्तान 279,699, 
सौदी अरब 278,835, 
इटली 248,070, 
बांग्लादेश 240,746, 
तुर्की 232,856, फ्रान्स 225,198, 
जर्मनी 211,220, 
अर्जेंटीना 201,919, 
इराक 129,151, 
कॅनडा 118,768, 
इंडोनेशिया 111,455, 
कतार 111,107, 
फिलीपीन्समध्ये 103,185 इतके कोरोना रुग्ण आढळले आहेत.