Anju-Nasrullah Love Story: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीना यांची प्रेमकहाणी चर्चेत असतानाच आता राजस्थानातून भिवाडी शहरात राहणारी अंजू पाकिस्तानात गेल्याची घटना समोर आली आहे. अंजू पाकिस्तानात राहणारा तिचा मित्र नसरुल्लाहला भेटण्यासाठी गेली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने देशात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
अंजू ही विवाहित असून या घटनेने तिचे पती अरविंद हे चिंतेत सापडले आहे. अंजू पाकिस्तानात गेल्याची त्यांना काहीच खबर नव्हती. अंजू आणि नसरुल्लाहला यांच्यात फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. गेले तीन ते चार वर्ष ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. आपल्या मित्राला भेटण्यासाठीच ती पाकिस्तानात गेल्याचं तिने म्हटलं आहे. त्याचवेळी अंजूला ती नसरुल्लाहलासोबत तिथे लग्न करणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावरही तिने स्पष्ट उत्तर दिले आहे.
अंजूने वाघा बॉर्डर ओलांडत पाकिस्तानात प्रवेश केला आहे. त्यासाठी तिने काही महिने आगोदरच व्हिसाची तयारी करुन ठेवली होती. त्यानंतर तिला 4 मेरोजी पाकिस्तानाकडून 90 दिवसांसाठी व्हिसा जारी करण्यात आला होता. २१ जुलैरोजी अंजू पाकिस्तानात गेली आहे तिथे ती पेशावरजवळ दीर अपर परिसरात आहे.
अंजूसोबत माध्यमांनी संपर्क साधल्यानंतर तिने ती पाकिस्तानात का गेली आहे. याचे कारण सांगितले आहे. तसंच, नसरुल्लाहलासोबत लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. अंजूने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीनुसार, ती पाकिस्तानात फिरण्यासाठी गेली आहे. त्याचबरोबर तिने पूर्ण कायदेशीर प्रक्रियादेखील पूर्ण केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानात तिच्या एका परिचिताचे लग्न आहे त्यात सहभागी होण्यासाठी ती पाकिस्तानात गेली आहे.
अंजूने पुढे म्हटलं आहे की, दोन वर्षांपूर्वी नसरुल्लाहलासोबत फेसबुकच्या माध्यमातून माझी मैत्री झाली होती. त्यानंतर आम्ही दोघांनीही एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले आणि व्हॉट्सअॅपवर आमचे बोलणे सुरु झाले. मी नसरुल्लाहलाला दोन ते तीन वर्षांपासून ओळखते. आत्ताही मी त्याच्याच घरी राहत आहे.
नसरुल्लाहलाच्या घरी मी सध्या राहत असून इथे त्याचा पूर्ण परिवार आहे. त्याच्या परिवारासोबत माझे चांगले संबंध आहे. त्याच्या घरी त्याच्या भावाचे लग्न आहे. त्यासाठीच मी पाकिस्तानात आली आहे. ही गोष्ट मी माझ्या आईला व बहिणींलाही सांगितली आहे.
नसरुल्लाह आणि माझ्यात फक्त मैत्री आहे. मी पाकिस्तानात लग्नात सहभागी होण्यासाठी आणि फिरण्यासाठी आली आहे. मी कंपनीतून 10 दिवसांची सुट्टी काढली होती. २-४ दिवसांत मी परत भारतात येईन, असं अंजू यांनी म्हटलं आहे. तसंच, सीमा हैदरसोबत माझी तुलना करु नका, असंही तिने म्हटलं आहे.