कोरोना नाही ना दुसरा कोणता व्हायरस, तरीही लागला लॉकडाऊन! नागरिक पार घाबरले...

Lions escaped from Sydney's Taronga Zoo : प्राणी संग्रहालयातून पाच सिंह पळाल्याची माहिती मिळताच संग्रहालयातील कर्मचारी अलर्ट झले. आता पाच सिंह सटकले म्हणून इमर्जन्सी लॉकडाऊन देखील लावण्यात आला. 

Updated: Nov 2, 2022, 11:14 PM IST
कोरोना नाही ना दुसरा कोणता व्हायरस, तरीही लागला लॉकडाऊन! नागरिक पार घाबरले... title=

Lions escaped from zoo : महाराष्ट्रात किंवा भारताच्या अनेक भागांमध्ये रस्त्यावर वाघ येणं काही नवीन नाही. अशा घटना नवीन नसल्या तरीही वाघ रस्त्यावर किंवा मानवी वस्तीत आलेत की नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. वन्य अधिकारी तातडीने बिबटे किंवा वाघांना जेरबंद करण्यासाठी योजना आखतात आणि त्यांना पकडण्यात येतं. पण आता जो प्रकार घडला तो अत्यंत भीषण आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकवणारा होता. एका प्राणी संग्रहालयातून एक दोन नव्हे तर तब्बल पाच सिंह निसटल्याची घटना नुकतीच घडली. घाबरू नका, सदर सर्व प्रकार हा भारतात नव्हे तर सिडनीमध्ये घडलेला आहे. आता प्राणी संगहालयातून तब्बल पाच सिंह सटकले म्हंटल्यावर तिथे लागला थेट लॉकडाऊन.    

ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये बुधवारी सकाळी एक अत्यंत घाबरवून टाकणारी घटना घडली. सिडनीत टारोंगा ( sydneys taronga zoo) प्राणी संग्रहालयातील पाच सिंह त्या प्राणी संग्रहालयातून निसटल्याचं समोर आलं. संभाव्य धोका जाणून तिथल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ इमर्जन्सी लॉकडाऊन ( Emergency Lockdown) लावण्याचा निर्णय घेतला. दिलासादायक बाब एवढीच की काही काळानंतर सर्व सिहांना जेरबंद करण्यात आलं आणि परिस्थिती नियंत्रणात आली. 

मीडिया रिपोर्टनुसार काही नागरिकांनी वयस्क सिंह आणि त्याच्या चार बछडयांना पहाटे 6.30 वाजता बाहेर पाहिलं. याबाबतची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काही क्षणात भीतीचं वातावरण तयार झालं. याबात माहिती देताना प्राणी संग्रहालयातील कार्यकारी संचालक सायमन डफी यांनी माहिती दिली. "याबाबतच्या सूचना मिळाल्यावर आम्ही लगेच इमर्जन्सी लॉकडाऊन लावण्याचे निर्देश दिले, असं त्यांनी संगितलं. खासी क्षणातच चार बछड्यांना पुन्हा प्राणी संग्रहालयात आणण्यात यश आल्याचं देखील त्यांनी सांगितलं." चार बछडे जरी प्राणी संग्रहालयात परत आले असले तरीही वयस्क सिंह अजूनही बाहेर होता. या मोठ्या सिंहाला पुन्हा प्राणी संग्रहालयात आणण्यासाठी तिथल्या कर्मचाऱ्यांना बरीच मेहनत करावी लागली.

हेही वाचा : iPhone Fake Check : बाजारात आला फेक आयफोन, तुमच्या हातातील आयफोन बोगस तर नाही? असं करा चेक...

सायमन यांच्या माहितीप्रमाणे, हे सर्व सिंह त्यांच्या संग्रहालयातील राहण्याच्या जागेतून बाहेर पडल्याचं समजताच अलार्मचा मोठा आवाज झाला. यामुळेच त्या भागात थेट इमर्जन्सी लॉकडाऊन लागला. हा अलार्म आसपासच्या भागांमध्येही ऐकू आला. दरम्यान प्राणी संग्रहालयाच्या अधिकृत माहितीमध्ये सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं गेलं आहे. 

सिहांनी कुणावर हल्ला केला का ?

यासारख्या घटनांचा सामना करण्यासाठी या प्राणी संग्रहालयात अत्यंत कठोर नियम ( Strict rules of zoo ) आहेत. कोणताही प्राणी त्याच्या राहण्याच्या जागेतून सटकल्यास उपस्थितांना सुरक्षित जागी नेण्यात येतं. या घटनेमध्ये कुणालाही कोणतीही इजा झाली नसल्याचं समोर आलेलं आहे. 

lions escaped from sydneys taronga zoo emergency lockdown implemented for some time