जगातील सर्वात नशीबवान व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य

हा अपघात इतका भयानक आहे की, त्यातून या व्यक्तीचा जीव वाचणे जवळ-जवळ अशक्यच आहे.

Updated: Jul 8, 2022, 05:00 PM IST
जगातील सर्वात नशीबवान व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य title=

मुंबई : सोशल मीडीयावर असे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात, जे आपल्याला नेहमीच आश्चर्यचकीत करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही म्हणाल की, यमराज कदाचित सुट्टीवर गेला असावा. हो कारणं या व्हिडीओ एका व्यक्तीतसोबत असा प्रकार घडला आहे की, ज्याची आपण कल्पना देखील करु शकत नाही. हा व्हिडीओ थक्कं करणारा आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती काहीतरी कागदपत्र घेऊन एका घराबाहेर उभा असतो. तेव्हा त्याच्यासोबत विचित्र घटना घडते. त्यावेळेला त्याच्या बाजूलाच असलेल्या हायवेवर एका ट्रकचा अपघात होतो.

हा अपघात इतका भयानक आहे की, त्यातून या व्यक्तीचा जीव वाचणे जवळ-जवळ अशक्यच आहे. परंतु तरी देखील त्या व्यक्तीचे प्राण वाचले. त्याला थोडंसं खरचटण्याशिवाय दुसरं काहीही झालेलं नाही.

हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. परंतु तरीही हा व्यक्ती यामधून वाचतो, ज्यामुळे त्या दिवशी यमराज सुट्टीवर होता असंच म्हणावं लागेल. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या एका सीसीटी कॅमेरात कैद झाली. ज्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटकरी या व्यक्तीला जगातील लकी व्यक्ती असल्याचे सांगत आहेत.

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा अनेकदा त्यांच्या अकाउंटवर धक्कादायक आणि प्रेरणादायी व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात, त्यांनी यावेळेला या व्यक्तीचा व्हिडीओ शेअर केला. जो खरोखरंच खुप धक्कादायक आहे. हा व्हिडिओ जवळपास 3 लाख वेळा पाहिला गेला आहे आणि 11 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे.