'नजर हटी दुर्घना घटी' म्हणतात ते हेच का? या मुलीसोबत काय घडलं, पाहा व्हिडीओ

आपण दरी डोंगरात फिरायला गेल्यावर तिथे माकड भेटतात. जर आपण त्यांचा समोर काही खात असाल तर ते हातातून घेऊन जातात. या मुलीसोबत असं काहीसं घडलं, ही मुलगी आईस्क्रिम खाताना ते अचानक तिच्या हातातून गायब झालं

Updated: Jul 8, 2022, 02:10 PM IST
'नजर हटी दुर्घना घटी' म्हणतात ते हेच का? या मुलीसोबत काय घडलं, पाहा व्हिडीओ title=

मुंबई - सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.  सोशल मीडियावर असाच एक अजब गजब व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्यही वाटेल आणि हसू पण येईल.  नेमकं काय आहे या व्हिडीओत तुम्हीच पाहा.

आपण दरी डोंगरात फिरायला गेल्यावर तिथे माकड भेटतात. जर आपण त्यांचा समोर काही खात असाल तर ते हातातून घेऊन जातात. या मुलीसोबत असं काहीसं घडलं, ही मुलगी आईस्क्रिम खाताना ते अचानक तिच्या हातातून गायब झालं, परंतु तिच्या हातातून हे आईस्क्रिम कोणी माकडाने नाही तर कोणी वेगळ्यानेच घेतलं आहे.

यासाठी तुम्ही हा व्हिडीओ एकदा पाहा

या व्हिडीओमध्येही मुलीच्या हातातून आईस्क्रिम एका सेकंदात गायब होतं. आईस्क्रिम इतर कोणी नाही तर गरुडाने लंपास केलं आहे.

हा व्हिडीओ गुलदुर बाकलिम नावाच्या यूजरने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधील मुलीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. काही क्षणात तिचा हातात असलेले आईस्क्रिम गायब होतं आणि ती हैराण होऊन जाते. व्हिडीओला अनेक युजर्संची पसंती मिळत आहे.