मध्य प्रदेशचे रस्ते वॉशिंग्टनपेक्षा भारी!

मध्य प्रदेशचे रस्ते हे अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनपेक्षाही चांगले आहेत

Updated: Oct 25, 2017, 08:09 PM IST
मध्य प्रदेशचे रस्ते वॉशिंग्टनपेक्षा भारी! title=

वॉशिंग्टन : मध्य प्रदेशचे रस्ते हे अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनपेक्षाही चांगले आहेत, असा अजब दावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केला आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकीची राजधानी वॉशिंग्टनमध्ये आयोजित एका परिसंवादात बोलातना त्यांनी हा दावा केलाय.

विमानतळावरून उतरल्यानंतर मी वॉशिंग्टनच्या रस्त्यावरून प्रवास केला तेव्हा मला मध्य प्रदेशचे रस्ते जास्त चांगले वाटले, असं चौहान म्हणालेत. आम्ही मध्य प्रदेशमध्ये 1.75 लाख किमीचे रस्ते बांधले आहेत, आणि सगळी गावं रस्त्यांना जोडली आहेत, अशी प्रतिक्रिया शिवराजसिंग चौहान यांनी दिली आहे.