तणाव आणि दहशत, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याने सांगितली धडकी भरवणारी कहाणी

'मला घरी परतायचं आहे, पण काहीच करु शकत नाही' भारतीय विद्यार्थ्याची व्यथा

Updated: Feb 21, 2022, 05:09 PM IST
तणाव आणि दहशत, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याने सांगितली धडकी भरवणारी कहाणी title=

Ukraine-Russia Crisis : रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये  (Ukraine) युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियन संकट घोंघावत असताना कोणत्याही स्थितीला प्रत्युत्तर देण्यास यूक्रेन सज्ज आहे. मात्र यूक्रेनमध्ये कमालीचा तणाव आहे. यूक्रेनमधील बंडखोर उत्पात माजवत आहेत.  (Russia Ukraine Crisis)

युक्रेनमध्ये अभ्यासाठी गेलेला मध्यप्रदेशमधला एक तरुण तिथे अडकला आहे. आसिफ असं या तरुणाचं नाव असून त्याने कुटुंबाला व्हिडिओ कॉल करुन युक्रेनमधल्या तणावपूर्ण परिस्थितीची माहिती दिला आहे. स्थानिक लोकांमध्ये तणावाचे वातावरण आहे, काहीतरी घडण्याची भीती सर्वांनाच आहे. फ्लाईट नसल्याने आम्ही देशात परत येऊ शकत नाही. सर्व घरांमध्ये कैद आहेत. आमचे वर्गही ऑनलाइन करण्यात आले आहेत, अशी माहिती आसिफने दिली आहे.

युक्रेनमधल्या तणावपूर्ण परिस्थितीबद्दल आसिफही घाबरला आहे. आसिफला लवकर मायदेशात परतायच आहे. माझ्यासारखे अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले असल्याचं आसिफने सांगितलं आहे. सध्या फक्त तीन उड्डाणं सुरु आहेत, त्याचंही भाडे अनेक पटींनी वाढलं आहे. तीन फ्लाईटमध्ये केवळ एक हजार प्रवासी जाऊ शकतील. पण इथे तब्बल 20 हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत, अशी व्यथा आसिफने मांडली आहे. भारत सरकारकडे आसिफ मदतीची मागणी केली आहे. 

आसिफचं कुटुंब तणावात
युक्रेन आणि रशियादरम्यानचा तणाण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आवश्यक नसेल तर युक्रेनमधल्या भारतीय नागरिकांनी मायदेशी परतावं अशा सूचना आधीच भारतीय सरकारने दिल्या आहेत. मध्यप्रदेशमधल्या छतरपूर शहरात राहणारे मुस्ताक खान यांचा मुलगा आसिफ युक्रेनमधल्या ओडेशा नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत एमबीबीएसचं शिक्षक घेतोय. 

पण आता युक्रेनमधल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्याच्या अभ्यासावरही परिणाम झाला आहे. शाळा-कॉलेज बंद करण्यात आले असून ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आलं आहे. आसिफसारखे अनेक विद्यार्थी घरात कैद आहेत. त्यांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

भारत सरकारकडून मदतीची अपेक्षा
कोविड काळात भारत सरकारने ज्या पद्धतीने परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी विशेष विमानं पाठवली होती. त्याप्रमाणे युक्रेनमध्ये अडलेल्या भारतीयांसाठी विशेष विमानं पाठवावीत अशी मागणी आसिफची आई राहत खातून यांनी केली आहे. त्यांना भारत सरकारकडून मोठी अपेक्षा आहे.