मालदीवमध्ये मोठं राजकीय संकट, भारताकडे मागितली मदत

मालदीवमध्ये मोठं राजकीय संकट उभं राहिलं आहे. राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश धुडकावले आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 5, 2018, 08:53 AM IST
मालदीवमध्ये मोठं राजकीय संकट, भारताकडे मागितली मदत title=

नवी दिल्ली : मालदीवमध्ये मोठं राजकीय संकट उभं राहिलं आहे. राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश धुडकावले आहेत.

राष्ट्राध्यक्षांनी आदेश नाकारल्याने लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश अमंलात आणण्यास सांगितले आहेत. सरकारने पोलीस आणि जवानांना आदेश दिले आहेत की, राष्ट्राध्यक्षांना अटक करावी किंवा त्यांच्यावर महाभियोग चालवावा. आदेश मान्य न केल्यास त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने भारतासह सर्व लोकशाही देशांना देशात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत मागितली आहे. 

चीफ जस्टिस अब्दुल्ला सईदने सरकारकडून दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेला फेटाळलं आहे. चीफ जस्टिसने म्हटलं आहे की, सरकारला पुनर्विचारची मागणी न करता आदेश मान्य करावे लागतील. यामुळे देशात सरकार आणि न्यायव्यवस्थेमध्ये संघर्षाची स्थिती तयार झाली आहे.

चीफ जस्टिसने आरोप लावले आहेत की, त्यांना आणि इतर न्यायाधीश अली हामिद आणि जूडिशल अॅडमिनिस्ट्रेटर हसन सईद यांना अज्ञात लोकांकडून धमकवलं देखील जात आहे. ते रात्री कोर्टातच राहणार आहेत. यानंतर सेना आणि पोलिसांनी  सुप्रीम कोर्ट परिसराला आपल्या ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष यामीन यांच्यावर नाराज असलेलं लोकं रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या विरोधात ते विरोध प्रदर्शनं करत आहे.