मुलीची पाठवणी करता वडिल तिच्या...,किळसवाणी प्रथा एकूण धक्का बसेल

Trending News : बापरे, ही प्रथा आहे की शिक्षा! मुलींची पाठवणी करताना वडिलांना करावं लागते 'ते' कृत्य, ऐकूण किळस येईल 

Updated: Nov 19, 2022, 09:49 PM IST
मुलीची पाठवणी करता वडिल तिच्या...,किळसवाणी प्रथा एकूण धक्का बसेल title=

Maasai Tribe Marriage : देशात लग्नाचा सीझन ( Wedding Season) सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी लग्नाचे ढोल-नगाडे वाजतायत.या लग्नाच्या सीझनमध्ये प्रत्येकालाच वेगवेगळ्या धर्माच्या चालिरीती आणि रीतीरीवाज (rituals) कळत असतात. असे पाहायला गेलं तर प्रत्येक धर्माचा रितीरीवाज आणि चालिरीती वेगवेगळ्या असतात. अशात एक अशीही प्रथा समोर आली आहे. ही प्रथा एकूण तूमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. 

जगातील प्रत्येक जाती धर्माचे लोक वेगवेगळ्या चालिरीती पाळतात. जर आपण फक्त भारताबद्दल बोललो तर प्रत्येक भागात राहणाऱ्या लोकांची स्वतःची वेगळी परंपरा आणि चालिरीती आहे. प्रत्येक धर्म आणि क्षेत्रानुसार चालिरीती बदलत राहतात. आज आम्ही तुम्हाला ज्या समाजाबद्दल सांगणार आहोत, त्या समाजामध्ये एक विचित्र प्रथा आहे. या प्रथेत मुलीच्या लग्नानंतर वडिलांना एक विचित्र प्रथा पाळावी लागते. ही प्रथा सर्वसामान्यांपेक्षा खूपच वेगळी आहे. 

'या' देशात पाळतात विचित्र प्रथा

केनिया आणि टांझानियामध्ये राहणाऱ्या मसाई जमात अनेक विचित्र परंपरा पाळण्यासाठी ओळखले जातात. या जमातीत लग्नाला खूप महत्त्व दिले जाते. अगदी थाटामाटात आणि उत्साहात लग्न सोहळे पार पडतात. या जमातीत सर्व विधी सुरळीत आहेत पण मुलीचा निरोप सर्वात विचित्र आहे.

वडील डोक्यावर थुंकतात

भारतात मुलीची पाठवणी करताना ती शेवटी आई-वडिलांची गळाभेट घेते आणि पायापडून सासरची वाट धरते. यावेळी आई-वडिल देखील तिच्या डोक्यावर हात ठेवून तिच्या आयुष्यासाठी तिला आशिर्वाद देतात. मात्र मसाई जमातीत लग्नानंतरच्या निरोपालाही स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. पण त्यांचा निरोप सामान्यापेक्षा थोडा वेगळा आहे.

थुंकणे वरदान मानतात

 या जमातीमध्ये लग्नाच्यावेळी जेव्हा मुलीला निरोप देताना जे दृश्य दिसते, ते सहसा आपण पाहू शकत नाही. निरोप घेताना मुलीचे वडील घरोघरी आपल्या मुलीच्या डोक्यावर थुंकत राहतात. या जमातीच्या विवाहांमध्ये निरोप देताना केला जाणारा हा एक विशेष विधी आहे, जो प्रत्येक वडिलांनी स्वीकारला आहे. विशेष म्हणजे, मसाई जमातीत विदाईच्या वेळी डोक्यावर थुंकणे वरदान मानले जाते. जर वडिलांनी डोक्यावर थुंकले नाही तर याचा अर्थ त्याने आपल्या मुलीला आशीर्वाद दिला नाही. या कारणास्तव, आपल्या मुलींच्या निरोपाच्या वेळी, सर्व वडील निश्चितपणे त्यांच्या डोक्यावर थुंकतात जेणेकरून मुलीचे नवीन जीवन आनंदाने भरलेले असेल.

दरम्यान या जमातीत सर्व विधी व्यवस्थित पार पडतात. फक्त पाठवणीची ही एकच प्रथा खुप विचित्र आहे.