सुर्यामध्ये फिरतोय विशालकाय साप ? सापाचा व्हिडिओ पाहून संशोधकही हैराण

सुर्यामध्ये एक विशायकाय साप फिरत असल्याचा दावा केला जात आहे. सापाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. विशेष म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी सोलर ऑर्बिटरनं (European Space Agency - ESA) हा व्हिडिओ बनवलाय. यात सूर्याच्या पृष्ठभागावर एका सापाच्या आकारासारखी हालचाल स्पष्टपणे हालचाल दिसतीय. हा व्हिडिओ 5 सप्टेंबर 2022चा असल्याचं सांगण्यात येतंय. 

Updated: Nov 19, 2022, 08:21 PM IST
सुर्यामध्ये फिरतोय विशालकाय साप ? सापाचा व्हिडिओ पाहून संशोधकही हैराण  title=

Serpent inside Sun : सुर्यामध्ये एक विशायकाय साप फिरत असल्याचा दावा केला जात आहे. सापाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. विशेष म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी सोलर ऑर्बिटरनं (European Space Agency - ESA) हा व्हिडिओ बनवलाय. यात सूर्याच्या पृष्ठभागावर एका सापाच्या आकारासारखी हालचाल स्पष्टपणे हालचाल दिसतीय. हा व्हिडिओ 5 सप्टेंबर 2022चा असल्याचं सांगण्यात येतंय. 

त्यावेळी सोलर ऑर्बिटर सूर्यांच्या अगदी जवळ होतं. सुर्याच्या पृष्ठभागावर दिसणारा हे चित्र आहे तरी काय? सापासारखी दिसणारी ती आकृती म्हणजे नेमकं काय? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत. 

सूर्यमालेत अशा अनेक घटना घडत असतात ज्या संशोधकांना समजणंही कठीण असतं. अशा सौर लहरींसाठी सूर्याचं चुंबकीय क्षेत्रही कारणीभूत असल्याचं मानलं जातं. लहरींच्या निर्मितीदरम्यान तापमानात चढ-उतार होत असतात आणि या चढउतारांमुळे अशा लहरी निर्माण होतात, असं शास्त्रज्ञ सांगतात.

याआधीही सूर्यावर अशाच प्रकारच्या हालचाली दिसल्या होत्या. मूळात सूर्याचं तापमान प्रचंड असल्यानं इतर ग्रहांप्रमाणे सुर्यावर यान पाठवून किंवा सॅटेलाईटच्या माध्यमातून सुर्यावरील स्थिती जाणून घेणं शक्य नाही. मात्र सुर्यावर वारंवार सौर वादळं येत असतात, त्यातूनच हे चित्र निर्माण झालंय हेही स्पष्ट होतंय.