'फर्स्ट लेडी' बनण्याच्या मानावरून डोनाल्ड ट्रंपच्या पत्नींमध्ये वाद

डोनाल्ड ट्रंप त्यांच्या वादग्रस्त वागणुकींमुळे सतत बातम्यांचा भाग बनलेले असतात.

Updated: Oct 10, 2017, 10:12 AM IST
'फर्स्ट लेडी' बनण्याच्या मानावरून डोनाल्ड ट्रंपच्या पत्नींमध्ये वाद  title=

अमेरिका : डोनाल्ड ट्रंप त्यांच्या वादग्रस्त वागणुकींमुळे सतत बातम्यांचा भाग बनलेले असतात.

ट्रंप प्रमाणेच 'फर्स्ट लेडी'च्या मानावरूनही त्यांच्या पत्नींमध्ये वाद रंगला आहे. सध्या मेलानिया ही डोनाल्ड ट्रंप यांची पत्नी आहे. तसेच मेलानियाला 'फर्स्ट लेडी'चा मान आहे. पण काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रंपयांच्या पहिल्या पत्नीने आपणच फर्स्ट लेडी असल्याचे वक्तव्य केले होते. 

डोनाल्ड ट्रंप यांची पहिली पत्नी इवाना ६८ वर्षीय असून व्यवसायाने मॉडेल आणि बिझनेसवुमन आहे. १९७७ साली डोनाल्ड ट्रंप आणि इवाना  विवाहबद्ध झाले होते मात्र १९९२ मध्ये ते एकमेकांपासून दूर गेले. 

 नुकत्याच एका टेलिव्हिजन शो मध्ये इवाना आल्या होत्या. त्यावेळेस 'रेजिंग ट्रंप' या पुसतकाचे प्रमोशन करताना मेलानियाची खिल्ली उडवली. 
 
 'माझ्याकडे व्हाईट हाऊसचा थेट नंबर आहे. पण मी तेथे फोन करत नाही. कारण तेथे मेलानिया आहे. माझ्यामुळे मेलानियाच्या मनात द्वेष निर्माण निर्माण होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कारण वास्तवात मी ट्रंपची पहिली पत्नी आहे.' असे इवाना म्हणाल्या.
 
 मेलानियांही हा प्रकार आवडला नसल्याने  इवानांनी हा सगळा प्रकार केवळ लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केला आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.