टेक्सास टेक युनिव्हर्सिटीमध्ये गोळीबार

  टेक्सास टेक युनिव्हर्सिटीमध्ये सोमवारी संध्याकाळी पोलिस विभागात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Oct 10, 2017, 08:00 AM IST
टेक्सास टेक युनिव्हर्सिटीमध्ये गोळीबार  title=

अमेरिका :  टेक्सास टेक युनिव्हर्सिटीमध्ये सोमवारी संध्याकाळी पोलिस विभागात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. 

टेक्सास युनिव्हर्सिटी ही अमेरिकेतील सहा टॉप युनिव्हर्सिटींपैकी एक आहे. युनिव्हर्सिटीने ट्विटरवरून ही बातमी दिली असून विद्यार्थ्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसाच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. 

 

काही दिवसांपूर्वी लास वेगास येथे  कॉन्सर्ट दरम्यानही एका माथेफिरूने गोळीबार केला होता. यामध्ये सुमारे ५९ लोकांंचा मृत्यू झाला होता.