लंडन : जर तुमचे पायाचा आकार मोठा असेल, तर तुमचा जोडीदार तुमच्यावर शंका घेऊ शकतो. कारण एका सर्वेक्षणात ही गोष्ट उघड झाली आहे की, मोठे पाय असलेले पुरुष पायांचा आकार लहान असणाऱ्यांपेक्षा जास्त फसवणूक करतात.
या सर्वेक्षणानुसार, ज्या पुरुषांच्या पायाची साईज 10 किंवा त्याहून अधिक आहे ते त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करतात. याउलट, सात किंवा त्यापेक्षा कमी साईज असलेल्यांमध्ये तुलनेने फसवण्याची शक्यता कमी असते.
'द सन'च्या अहवालानुसार, नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात पुरुषांचं अफेअर त्यांच्या पायाच्या साईजशी जोडण्यात आलं. या दरम्यान असं समोर आलं की, ज्यांच्या पायाची साईज मोठी आहे ते त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करून दुसर्याशी संबंध ठेवण्याची शक्यता जास्त असते. डेटिंग साइट 'Illicit Encounters'ने या सर्वेक्षणात सुमारे 2000 पुरुषांची मुलाखत घेतली. यामध्ये, मोठे पाय असलेल्या बहुतेक विवाहित पुरुषांनी कबूल केलं की त्यांचं अफेअर होतं.
वेबसाईटच्या प्रवक्त्या जेसिका लिओनी म्हणाल्या की, पुरुषांच्या पायाच्या आकाराच्या आधारे ते फसवणूक होण्याची किती शक्यता आहे हे शोधता येतं. उदाहरणार्थ, ज्या पुरुषांच्या पायाचा आकार 11 आहे ते फसवणूक करण्याची 29 टक्के शक्यता असते. त्याचप्रमाणे, आकार 10 - 25%, आकार 12 - 22% आकार 13 आणि त्यावरील ते त्यांच्या जोडीदाराची फसवणूक होण्याची 21 टक्के शक्यता असते.
जेसिका लिओनी म्हणाल्या, 'मोठे पाय असलेले पुरुष तुलनेने उंच असतात, त्यामुळे ते इतर महिलांना आकर्षित करण्याची अधिक शक्यता असते. यामुळे त्यांचं अफेअरही जास्त काळ टिकतं.
त्या पुढे म्हणाल्या की, पायांची साईज 10 किंवा त्यापेक्षा अधिक असेल ते विवाहित पुरुषांचं अफेअर असण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात असंही आढळून आलं की, ज्यांच्या पायाची साईज 10 पेक्षा कमी आहे, त्यांनी त्यांच्या जोडीदाराची कधीही फसवणूक केल्याचं सांगितलं नाही. उलट मोठे पाय असलेल्या लोकांनी कबूल केलं की त्यांचं वैवाहिक जीवन सुरु असूनही त्यांचे संबंध होते.