Merry Christmas: अन् लोकांच्या डोळ्यांदेखत हरणांचा कळप विमानाला घेऊन चक्क उडाला आकाशात!

व्हायरल झालेल्या व्हिडिओत चक्क विमान हरणाचा कळप या विमानाला ओढत असल्याचं दिसतंय. धावपट्टीवर विमान ओढल्यानंतर हरणासह हे विमान आकाशात उडतं. पण, हे कसं काय शक्य आहे?

Updated: Dec 28, 2022, 09:25 PM IST
Merry Christmas: अन् लोकांच्या डोळ्यांदेखत हरणांचा कळप विमानाला घेऊन चक्क उडाला आकाशात! title=

Herd of deer flying with a plane : एका व्हायरल व्हिडीओवरून (Viral Video) दावा करण्यात येतोय की, हरणांचा कळप (herd of deer) विमानासोबत आकाशात उडतोय. या व्हिडिओत चक्क विमान हरणाचा कळप या विमानाला ओढत असल्याचं दिसतंय. धावपट्टीवर विमान ओढल्यानंतर हरणासह हे विमान आकाशात उडतं. पण, हे कसं काय शक्य आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.

सोशल मीडियावर हे विमान हरणांचा कळपच ओढतोय असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे हा व्हिडिओ कुठला आहे...? कधीचा आहे...? याची पडताळणी केली गेली. मुख्य म्हणजे हा व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर नेमकं सत्य समोर आलं आहे.

व्हिडीओमागील समोर आलेलं सत्य

  • विमानाला हरणाचा कळप ओढतानाचा व्हिडिओ अॅनिमेटेड आहे
  • एमिरेट्स एअरलाइन्सचा व्हिडिओ ख्रिसमसच्या शुभेच्छांसाठी आहे
  • अधिकृत इंटाग्राम पेजवरून व्हिडिओ शेअर केलाय

या विमानावर एक मोठी सांताची टोपीही लावण्यात आली आहे. या मनोरंजक व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “कॅप्टन क्लॉज, टेक-ऑफसाठी विनंती करत आहोत, असं एमिरेट्सकडून ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यात आल्यायत. ख्रिसमस निमित्त एमिरेट्स एअरलाईन्सने हटके शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता...पण, काहींनी हा व्हिडिओ व्हायरल करून हरणं कशी विमान ओढत नेतायत बघा, असा दावा करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.