वॉशिंग्टन : अमेरिकेतील मिसीसिपी येथे एका नऊ वर्षाच्या भावाने आपल्याच बहिणीची (१३) गोळ्या घालून हत्या केली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दोघांमध्ये व्हिडिओ गेम कंट्रोलर घेण्यावरून वाद झाला होता.
मुनरो काऊंटीच्या शेरिफ सेसिल कॅट्रल ने सांगितले की, ही घटना शनिवारी घडली. प्राप्त माहितीनुसार, दोघेही बहिण भाऊ व्हिडिओ गेम खेळत होते. दरम्यान, बहिणीने भावाला व्हिडिओ गेमचा कंट्रोलर द्यायला विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या भावाने बहिणिच्या डोक्यात पाठिमागच्या बाजूने जवळून गोळ्या झाडल्या. डोक्यातून गोळ्या आरपार गेल्याने बहिण गंभीर जखमी झाली. जखमी आणि रक्तबंबाळ आवस्थेत बहिणीला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, तपास सुरू केला आहे. या मुलाकडे बंदुक कोठून आली तसेच, तो इतका का संतापला होता असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे.