Mary Magdalene : आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी पाहिजे ती जोखीम पत्करायला तयार असतो. यातही मॉडलिंग (Modeling) किंवा अभिनयाचं (Acting) क्षेत्र असेल तर स्पर्धा अधिक तीव्र होते. इतरांपेक्षा हॉट (Hot) आणि ग्लॅमरस (Glamorous) दिसण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. पण करत असताना काही जण नको तो मार्ग स्विकारतात आणि याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. सुंदर दिसण्यासाठी सध्या अनेक जण प्लास्टिक सर्जरीचा मार्ग निवडतात. सध्या फॅशनचं दुसरं नाव प्लास्टिक सर्जरी असं झालंय.
मूळ ओळख बदलण्याचा प्रयत्न
मॉडेल किंवा अभिनेत्री म्हटलं की नितळ सोंदर्य आणि परफेक्ट फिगर असं चित्र आपल्यासमोर उभं राहातं. हॉट आणि सुंदर दिसण्यासाठी अनेक वेळा प्लास्टिक सर्जरी केली जाते. एका मॉडेलने इतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी हाच मार्ग निवडला, पण यामुळे तिला अतिशय वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलंय. सुंदर दिसण्याच्या नादात आज ती मॉडेल आरशातही आपलं रूप पाहू शकत नाही.
या मॉडेलचं नाव आहे मेरी मॅग्डलीन (Mary Magdalene), ती कॅनडामध्ये राहाणारी आहे. आपला फिगर परफेक्ट आणि मादक दिसावं यासाठी मेरीने ब्रेस्ट इम्प्लांट शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर तिला अपेक्षित असलेला रिझल्ट तिला मिळाला. ती बोल्ड आणि सेक्सी दिसू लागली. पण शस्त्रक्रियेच्या काही महिन्यांनंतर तिचा एक ब्रेस्ट अचानक फाटला. यामुळे तिचं रुपच बदललं.
सर्जरीवर 81 लाख रुपये खर्च
मिळालेल्या माहितीनुसार 30 वर्षांच्या मेरीने आतापर्यंत अनेक सर्जरी केल्या आहेत. गेल्या काही महिन्यात तीन वेगवेगळ्या अवयवांवर तब्बल 1 लाख डॉलर म्हणजे जवळपास 81 लाख रुपयांहून अधिक खर्च केला आहे. पण आता या सर्जरीचे परिणाम दिसू लागले आहेत. तिला पाठिच्या दुखण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आता परिस्थिती अशी आहे की फिरण्यासाठी तिला व्हिलचेअरचा वापर करावा लागतो.
मेरीने केवळ ब्रेस्ट इम्प्लांटचं केलं नाही तर तीने होठांचीही सर्जरी केली आहे. पूर्ण शरीरावर तीने टॅटू गोंदवले आहेत. पण आता याचे वाईट परिणाम तिला भोगावे लागत असून आपलं शरीर आधीसारखं नॅचरल बनवण्याचे प्रयत्न ती करतेय.
21 व्या वर्षात पहिली सर्जरी
मॉडेल म्हणून मेरी जेव्हा या क्षेत्रात उतरली तेव्हा वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी तीने पहिली शस्तक्रिया केली. पण यानंतर सुंदर दिसण्याच्या नादात अनेक शस्त्रक्रिया करुन घेतल्या. यात कॅट आय सर्जरी, आयब्रो, बेस्ट इम्प्लांट, होठांची सर्जरी याचा समावेश होता.