हॉटेलच्या बेडरुम- बाथरुममध्ये जाणंही धोक्याचं; 10 छुप्या कॅमेरे पाहून मॉडेलला हादरा

ट्विटरवर एका मॉडलची पोस्ट व्हायरल होत आहे. तिने दावा केला की, ऑनलाईन बुकिंगनंतर जेव्हा ती एका हॉटेलच्या फ्लॅटमध्ये राहायला गेली. तेव्हा तिला त्या फ्लॅटच्या बेडरूममध्ये कॅमेरे लावलेले दिसून आले. 

Updated: Jun 17, 2022, 11:33 AM IST
हॉटेलच्या बेडरुम- बाथरुममध्ये जाणंही धोक्याचं; 10 छुप्या कॅमेरे पाहून मॉडेलला हादरा title=

नवी दिल्ली : ट्विटरवर एका मॉडलची पोस्ट व्हायरल होत आहे. तिने दावा केला की, ऑनलाईन बुकिंगनंतर जेव्हा ती एका हॉटेलच्या फ्लॅटमध्ये राहायला गेली. तेव्हा तिला त्या फ्लॅटच्या बेडरूममध्ये कॅमेरे लावलेले दिसून आले. 

सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका मॉडेलला वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावं लागलं. तेथे पोहचल्यानंतर ऑनलाईन बुक केलेल्या फ्लॅटवर ती राहायला गेली. परंतू त्या फ्लॅटच्या वेगवेगळ्या भागात तीला 10 स्पाय कॅमेरे असल्याचे आढळून आले. तिने त्या संबधीचा व्हिडीयो ट्विटरवर शेअर केला आहे.

मॉडेलने म्हटलं की, तिने अमेरिकेच्या फिलडेल्फियामध्ये एक फ्लॅट घेतला होता. त्या फ्लॅटमध्ये अनेक ठिकाणी छुपे कॅमेरे लावले होते. फोटो शेअर करीत त्यांनी लिहलं की, Airbnb या ऑनलाईन प्रॉपर्टी बुकिंग वेबसाईटवरून बुकिंग करताना सावधान रहा. पुर्ण घरात 10 पेक्षा जास्त हिडन कॅमेरे लावण्यात आले होते. एवढेच नाही तर बेडरूममध्येही छुपे कॅमेरे लावले होते. 

पुढे तिने म्हटलं की, Airbnb कंपनीने आम्हाला रिफंड देखील दिले नाही. त्यांनी आम्हाला फक्त दुसऱ्या Airbnb मध्ये शिफ्ट केलं. आम्ही याबाबत कंपनी आणि पोलीस स्टेशन दोन्ही ठिकाणी तक्रार दाखल केली आहे. आम्हाला हे देखील माहिती नाही की, आमचे कोणत्याप्रकारचे फुटेज त्यांच्याकडे आहेत. 

ही अत्यंत अस्वस्थ करणारी गंभीर बाब आहे. ईश्वराचे आभार मानते की, आम्हाला कॅमेरे असल्याचे वेळीच कळले. तसेच वेळीच तेथून काढता पाय घेतला. 

या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रीया व्यक्त झाल्यानंतर Airbnb च्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, हिडन कॅमेऱ्यांबाबत आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. हिडन कॅमेऱ्याबाबत आमचे नियम अत्यंत कडक आहेत. असे पुन्हा आमच्या प्रॉपर्टीत घडू नये याची आम्ही दक्षता घेऊ.