Monkeypox : 20 देशांत मंकीपॉक्सचा उद्रेक, प्रसार रोखण्यासाठी जलद पावले उचलण्याचे WHO च्या सूचना

मंकीपॉक्स हळूहळू आता वेगवेगळ्या देशांमध्ये पसरत चालला आहे.

Updated: May 27, 2022, 08:02 PM IST
Monkeypox : 20 देशांत मंकीपॉक्सचा उद्रेक, प्रसार रोखण्यासाठी जलद पावले उचलण्याचे WHO च्या सूचना title=

जिनिव्हा : देशांनी मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी जलद पावले उचलली पाहिजेत असे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. त्यांनी म्हटलं की, "आम्हाला वाटते की जर आपण आता योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत". WHO संचालक सिल्वी ब्रायंड यांनी यूएन एजन्सीच्या वार्षिक संमेलनात सांगितले. मंकीपॉक्स हा सामान्यतः सौम्य विषाणूजन्य संसर्ग आहे जो पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या काही भागांमध्ये आढळला होता. 

हा व्हायरस प्रामुख्याने जवळच्या संपर्काद्वारे पसरते आणि अलीकडेच युरोप, युनायटेड स्टेट्स आणि इतर भागात वाढल्याने चिंता वाढली आहे.

आतापर्यंत, सुमारे 20 देशांमध्ये सुमारे 300 प्रकरणं समोर आली आहेत. जिथे याआधी व्हायरस आढळला नव्हता.

सदस्य देशांनी चेचक लसींच्या साठ्यांबद्दल माहिती देखील शेअर केली पाहिजे. जी मंकीपॉक्स विरूद्ध देखील प्रभावी ठरू शकते, असे ही ब्रायंड म्हणाले. "आम्हाला जगात उपलब्ध असलेल्या डोसची नेमकी संख्या माहित नाही आणि म्हणूनच आम्ही देशांना डब्ल्यूएचओकडे येण्यास आणि त्यांच्याकडे किती साठे उपलब्ध आहे याबाबत डेटा मागवत आहोत.