दहा मुलांना जन्म द्या, 13 लाखांचं बक्षीस मिळवा; विचित्र ऑफरने महिलाही चक्रावल्या

इकीकडे लोकसंख्या नियंत्रणाची भाषा केली जात असली तरी रशियाला मात्र अल्प लोकसंख्येची मोठी भिती वाटत आहे. कारण कोरोनाकाळात आणि युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात...

Updated: Aug 18, 2022, 03:42 PM IST
दहा मुलांना जन्म द्या, 13 लाखांचं बक्षीस मिळवा; विचित्र ऑफरने महिलाही चक्रावल्या    title=

Russia News : इकीकडे लोकसंख्या नियंत्रणाची भाषा केली जात असली तरी रशियाला मात्र अल्प लोकसंख्येची मोठी भिती वाटत आहे. कारण कोरोनाकाळात आणि युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात असंख्य रशियन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लोकसंख्या कायम राखण्यासाठी तेथील सरकारने ‘मदर हिरोईन’ (Mother Heroine) नावाने एक योजना सुरू केली आहे. यानुसार रशियात ज्या महिला १० मुलांना जन्म देतील त्या महिलांना 1 दशलक्ष रूबल (सुमारे 13 लाख रुपये) दिले जाणार आहेत. असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ही घोषणा केली आहे.

रशियात कोरोना महामारीत लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर महामारी संपताच युक्रेनसोबत सुरू झालेल्या युद्धात रशियन सैनिकांसह ५० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे आता ही योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दहा मुलं जन्माला घालणाऱ्या महिलेला दहाव्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त संबंधित महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग जमा करण्यात येणार आहे.  मात्र, या निर्णयाला विरोध सुरू झाला असून रशियन तज्ञ्जाचे म्हणणे असे, हा निर्णय निराशा आणि हतबलता दर्शविणारा आहे. रशियाची लोकसंख्या कमी झाल्याची बाब जरी सत्य असली तरी १९९० पासून रशियात लोकसंख्यावाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.  रशियात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्या असताना केवळ 1 दशलक्ष रुबल्समध्ये दहा मुलांचं पालनपोषण कसं केलं जाऊ शकतं? ते कुठे राहणार आहेत?, असेही सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.