Mother hides her Daughter in Drawer for 3 Years : घरात बाळाच आगमन होणार म्हटल्यावर सर्वात प्रथम याची चाहुल आईला लागते. ही गोड बातमी कळल्यावर तिचा आनंद गगणात मावत नसतो. आई आणि बाळाचं नातं हे जगात सर्वात भारी असतं. गर्भातच त्यांची नाळ जोडली असते. बाळाचा जन्माने आईही परीपूर्ण होते. पण एका आईचा क्रूर आणि निर्दयी कृत्य जगासमोर आलंय. या आईन नवजात बाळा तब्बल तीन वर्षे बेडच्या ड्रॉवरमध्ये कोंडून ठेवलं होतं. या भयावह कृत्यामागील कारण कळल्यावर तुम्हाला धक्का बसेलच शिवाय रागही अनावर होईल.
हा महिलेने आपल्या नवजात मुलीला 3 वर्षे बेडच्या ड्रॉवरमध्ये कोंडून ठेवले. ती जेव्हा घराबाहेर जायची ऑफिस असो किंवा पार्टीसाठी तेव्हा तेव्हा हे नवजात बाळ त्या बेडच्या ड्रॉवरमध्ये पडलेले असायचं. जेव्हा तीन वर्षांनंतर हे कळलं तेव्हा ती मुलगी एका 7 महिन्यांच्या बाळासारख निस्तेज, पातळ मांस आमि हाड्यांचा नुसता सांगाडा होता. या महिलेच्या कृत्यामागील कारण कळल्यावर सर्वांनाच धक्का बसला.
खरं तर हे प्रकरण युनायटेड किंगडमचे असून या प्रकरणात चेस्टर क्राउन कोर्टाने महिलेला तुरुंगात पाठवलंय. महिलेने कोर्टात मुलावर झालेल्या अन्यायाची कबुली दिली तेव्हा सर्वांचेच हृदय हादरले. 3 वर्षे ही मुलगी जिवंत प्रेतासारखी ड्रॉवरमध्ये पडून होती. तिला या ड्रॉवरमध्ये कित्येक तास अन्न-पाणीही मिळालं नव्हतं. मुलीला सिरिंजद्वारे दूध आणि वीटाबिक्स पाजण्यात आलं. या निष्पाप मुलीला तिचं नावही माहीत नव्हतं.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मुलीची आई अनेकदा नातेवाईकांच्या घरी ख्रिसमस पार्टीसाठी जा़यची. ऑफिसला जातानाही ती मुलाला ड्रॉवरमध्ये सोडायची. कोर्टाने जेव्हा आईला या क्रौर्याचे कारण विचारले तेव्हा तिचं उत्तर ऐकून संताप झाला. मुलीला ड्रॉवरमध्ये ठेवण्याची ही प्रक्रिया 3 वर्षे सुरू होती. एके दिवशी महिला घरी नसताना महिलेचा प्रियकर आला, त्याला बेडरूममधून मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि जेव्हा तो खोलीत पोहोचला तेव्हा ड्रॉवर उघडून पाहिल्यावर त्याला धक्काच बसला.
महिलेने कोर्टात आपला गुन्हा कबूल करताना सांगितलं की, तिला बायफ्रेंड होता तरीदेखील तिचं दुसऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर ती गर्भवती झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. कुटुंबातील लोकांना आणि प्रियकराला या मुलीबद्दल काहीच माहिती नव्हतं. तिने ही घटना सर्वांपासून लपवून ठेवली होती. तिचं हे कृत्य कोणाला कळू नये म्हणून तिने त्या बाळाला बेडखाली ड्रॉवरमध्ये लपवून ठेवलं होतं. मात्र, महिलेच्या प्रियकराने हे गुपित उघड केलं. दरम्यान या कृत्यासाठी न्यायालयाने महिलेला साडेसात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.