NASA ला 9 पट मोठी ‘पृथ्वी’ सापडली! फक्त पाणी नव्हे महासागरं असण्याची शक्यता

पहिल्यांदाच पाणी असलेला पृथ्वी सारखा दुसरा ग्रह सापडला आहे. येथे जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचीही शक्यता वर्तवली जातेय. यामुळे पर ग्रहावर मानवी विसकीत करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होवू शकतो.  

वनिता कांबळे | Updated: Sep 12, 2023, 08:33 PM IST
NASA ला 9 पट मोठी ‘पृथ्वी’ सापडली! फक्त पाणी नव्हे महासागरं असण्याची शक्यता  title=

K2-18B Planet:  चंद्र आणि मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करण्याच्या अनुषंगाने संशोधक अथक परिश्रम घेत आहेत. अशातच NASA ला पृथ्वीसारखा दिसणारा ग्रह सापडला आहे. हा ग्रह पृथ्वी पेक्षा 8.6 पट मोटा आहे. या ग्रहावर फक्त पाणी नव्हे महासागरं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ग्रहाला K2-18B एक्सोप्लॅनेट असे नाव देण्यात आले आहे. 

नासाच्या वेब टेलिस्कोपने K2-18B हा एक्सोप्लॅनेट शोधला

नासाच्या वेब टेलिस्कोपने K2-18B हा एक्सोप्लॅनेट शोधला आहे.  एक्सोप्लॅनेट K2-18B सध्याच्या पृथ्वीपेक्षा 8.6 पट मोठा आहे. या  ग्रहाच्या वातावरणात मिथेन वायू आणि कार्बन डायऑक्साईडशी संबंधित रेणूही सापडले आहेत. या ग्रहावर मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असल्याने याला हायसेन प्लॅनेट असेही म्हंटले जात आहे. 

पृथ्वीपासून 120 प्रकाशवर्षे

K2-18B हा एक्सोप्लॅनेट  पृथ्वीपासून 120 प्रकाशवर्षे दूर आहे.  K2-18B या एक्सोप्लॅनेटचा आकार जवळजवळ पृथ्वी आणि नेपच्यूनच्या आकाराएवढा आहे. हा ग्रह सौरमालेतील इतर ग्रहांपेक्षा वेगळा आहे. 

K2-18B या एक्सोप्लॅनेटवर जीवसृष्टी असण्याचे संकेत

संशोधनादरम्यान खगोलशास्त्रज्ञांना या ग्रहावर  मिथेन, अमोनियासह इतर वायू आणि रसायने सापडली आहेत, परंतु ही रसायने तुलनेने कमी प्रमाणात आहेत. परंतु हे वायू जैविक प्रक्रियेच्या कार्यात कितपत उपयुक्त ठरतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, येथे मोठ्या प्रमाणात हायड्रोजन आहे. या ग्रहावर पाण्याचे महासागर आहेत. यामुळे येथे जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर अधिक संशोधन सुरु आहे. या ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वासा असल्यास येथे मानवी वस्ती विकसीत करता येवू शकते.  या ग्रहावर पाणी असल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे या ग्रहावर सृष्टी असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. सूर्यमालेच्या बाहेरचा ग्रह आहे. या ग्रहावर पृथ्वीएवढंच तापमान असल्यामुळे हे सजीवसृष्टीला पोषक असल्याची माहिती अवकाश विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या फ्रान्समधल्या संस्थेनं म्हटलंय. सूर्यमालेच्या पलिकडल्या ग्रहावर पाणी आढळल्याची ही पहिलीच घटना आहे. पृथ्वीसारखाच केटू-18 बीवर खडकाळ भाग आढळल्याचंही फ्रान्सच्या अवकाश शास्त्रज्ञांचं म्हणण.

हे देखील वाचा - NASA ने मंगळ ग्रहावर तयार केला ऑक्सिजन, मानवी वसाहतीच्या दिशेनं सर्वात मोठं पाऊल