नाशिकच्या कश्मीरा आंधळेचा युके सरकारकडून गौरव

युके सरकारकडून काश्मिराचा गौरव

Updated: Jun 30, 2018, 05:43 PM IST
नाशिकच्या कश्मीरा आंधळेचा युके सरकारकडून गौरव  title=

नाशिक : युकेच्या आरोग्यसेवेत विशेष योगदान दिल्याने नाशिकच्या कश्मीरा आंधळे या तरुणीचा युके सरकारकडून गौरव करण्यात आला आहे. युकेमध्ये १९४८ ला स्थापन झालेल्या नॅशनल हेल्थ स्कीमच्या सत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त युके सरकारच्या वतीने संस्थेच्या स्थापनेपासून प्रथमच या पुरस्काराचे वितरण करण्यात आलं आहे.

युकेच्या वैद्यकीय क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या अश्वेत आणि अल्पसंख्यांक वंशाच्या दहा व्यक्तींची या गौरवासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये फिजीओथेरपिस्ट म्हणून इंग्लंडमध्ये १५ वर्षांपासून योगदान देणाऱ्या कश्मिरा आंधळे यांची निवड करण्यात आली होती. सरकारने वाईंडरश ७० या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने कश्मीरा आंधळे यांना सन्मानित केलं आहे.