इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानी सर्वोच्च न्यायायालनं जोरदार दणका दिलाय. पनामा गेट प्रकरणी झालेल्या सुनावणीत कोर्टानं नवाज शरीफ यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळ त्यांना पदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. न्यायालयाच्या दणकेनंतर विरोधी पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान याने जोरदार हल्लाबोल केलाय.
पनामा प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर इम्रान खानने नवाज शरीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, असं म्हणत त्यांनी शरीफ यांना सूचक इशारा दिलाय.
इम्रान खानने पत्रकारांशी संवाद साधताना न्याय व्यवस्थेचे आभारही मानले आहेत. पाकिस्तानच्या तहरिक ए इन्साफ पार्टीच्या अध्यक्षांनी रविवारी इस्लामाबादच्या परेड ग्राऊंडमध्ये आभार प्रदर्शनासाठी रॅलीचं आयोजनही केलं आहे.
मी पाकिस्तानमधील लोकशाही, गरिबांच्या सशक्तीकरणासाठी संघर्ष केलाय. शरीफ यांच्या परिवाराला मी ४० वर्षांपासून ओळखतो आहे. माझी त्यांच्या परिवाराशी कोणतंच वैयक्तिक वैर नाही, असे इम्रान खान म्हणाला.