लॉस एन्जलिस : लॉस एन्जलिसचे जादूगर जस्टिन विलमन आणि त्याची पत्नी जिलियन सिपकिंन यांनी लग्नाच्यावेळी असा डान्स केला, तो आता व्हायरल होत आहे. २०१४ मध्ये हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला होता. पण आता व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये दोघे वेगवेगळ्या स्टेप करताना दिसत आहेत. यात दोघे वेगवेगळे स्टंट करताना दिसत आहे. स्टंट पाहून उपस्थित प्रत्येक जण हैराण होत आहे.
वधू जादूगर विलमनवर मॅजिक करते आणि तो हवेत लटकतो. हे दृश्य पाहून वातावरण शांत होते आणि त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट होतो.
हा व्हिडिओ यूट्यूबवर सर्वात प्रथम जस्टीन विलमन यांनी अपलोड केला होता. अपलोड झाल्यावर सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. इतके वर्ष झाले तरी सोशल मीडियावर याची चर्चा अजूनही कायम आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १ कोटी ९५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.