नाईट क्लबमध्ये ड्रिंकच्या एका घोटाने केलेली तरुणीची हालत पाहून कदाचित तुम्ही कधीही ड्रिंक घेणार नाही

युनायटेड किंग्डच्या एक्सेसमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. 

Updated: Aug 5, 2021, 03:24 PM IST
नाईट क्लबमध्ये ड्रिंकच्या एका घोटाने केलेली तरुणीची हालत पाहून कदाचित तुम्ही कधीही ड्रिंक घेणार नाही

मुंबई : युनायटेड किंग्डच्या एक्सेसमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये एका 18 वर्षीय मुलीचं शरीर बर्फासारखं गोठलं असल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. सध्या या युवतीवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. 

ही मुलगी नाइट क्लबमध्ये गेली होती. त्या ठिकाणी तिची एका अनोळखी मुलाशी ओळख झाली. यानंतर त्याने तिला ऑफक केलेलं ड्रिंक ती प्यायली. आणि हे ड्रिंक प्यायल्यानंतर तिचं संपूर्ण शरीर फ्रीज झालं म्हणजे बर्फासारखं गोठून गेलं. एका पुतळ्याप्रमाणे तिचं शरीर झालं. हात किंवा पाय ती शरीराचा कोणताही भाग हलवू शकत नव्हती.

युवती पहिल्यांदा गेली होती नाईट क्लबमध्ये

एका रिपोर्टनुसार, या मुलीचं नाव मिली टॅपलिन आहे. सुमारे 4 तास मुलीचे शरीर गोठलेलं होतं. 18 वर्षा पूर्ण झाल्यानंतर ती पहिल्यांदा नाईट क्लबमध्ये गेली. मिलीच्या आईने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

मिलीच्या आईने सांगितले की, मिलीची नाईट क्लबमध्ये एका अनोळखी व्यक्तीशी मैत्री झाली होती. त्याने आपल्या मिलीला एक ड्रिंक प्यायला दिलं. जे प्यायल्यानंतर मिलिचं शरीर गोठून गेलं. त्यानंतर घाईघाईत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Viral News: ड्रिंक पीने के बाद फ्रीज हो गया युवती का शरीर, मां ने शेयर की डरावनी फोटो

मुलीच्या आईने सांगितलं की, शरीर गोठल्यानंतर तिचे डोळे पूर्णपणे उघडे होते. इतंकच नाही तर तिचं तोंडंही वाकलेलं होतं आणि बोटंही वाकडी झाली होती. 

शुद्धीवर आल्यानंतर, मिलीने सांगितलं की, मी फक्त ड्रिंकचे दोन घोट घेतले होते. मी संपूर्ण ड्रिंक प्यायली नाही. त्यानंतर मी धुम्रपान क्षेत्रात गेले. मग जेव्हा मी परत आले तेव्हा मला वाटलं की मी खूप दारू प्यायली आहे. यानंतर मी माझ्या शरीरावर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि माझं शरीर गोठून गेल्यासारखं झालं.