Window Pain : Ex Girlfriend च्या घरी घुसण्याचा प्रयत्न तरूणाला चांगलाच महागात पडला

अगदी जीव गमावण्याची आली असती वेळ 

Updated: Aug 5, 2021, 11:01 AM IST
Window Pain : Ex Girlfriend च्या घरी घुसण्याचा प्रयत्न तरूणाला चांगलाच महागात पडला

मुंबई : नातं कितीही तुटलं तरी त्याची आठवण कायमच राहते. आपल्या माणसांची ओढ ही नात दुरावलं तरी काम राहतं. हीच आठवण काठण एका नशेत असलेल्या तरूणाला महागात पडलं आहे. दारू पिऊन आपल्या एक्स गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या तरूणाची चांगलीच फजिती झाली आहे. 

दारूच्या नशेत असलेला तरूण एक्स गर्लफ्रेंडच्या घरी खिडकीतून घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हा आशिक बराच वेळ खि़कीतच अडकून राहिला. नंतर पोलिसांनी येऊन तरूणाला बाहेर काढलं. 

डॉक्टरांचं म्हणणं आहे की,'तरूणाला फार काही लागलेलं नाही. मात्र दर घुसमटल्यामुळे त्याचा जीवही जाऊ शकत होता.' पोलिसांनी या तरूणाला अटक केली आहे. या आरोपी युवकाने एक्स गर्लफ्रेंडवर संबंध ठेवल्याचे आरोप केले आहेत. मात्र ती हे मान्य करत नसल्यामुळे तिच्या घरी लपून घुसण्याचा प्रयत्न करत होता. 

एक्स गर्लफ्रेंड घरी उपस्थित होती

घटना घडली तेव्हा आरोपीची एक्स गर्लफ्रेंड त्यांच्या घरी उपस्थित होती. जेव्हा ती आरोपीच्या किंकाळ्या ऐकून आली, तेव्हा तिला हे पाहून आश्चर्य वाटले की तिचा एक्स बॉयफ्रेंड तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर तिने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना खिडकीत अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी खूप मद्यधुंद होता आणि बेशुद्ध झाला होता. एवढेच नाही तर त्याला श्वासही घेता येत नव्हता.