अण्णासाहेब चवरे, झी मीडिया, मुंबई : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किंम जोंग हा त्याच्या हुकूमशाही आणि क्रुरतेमुळे जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो त्याच्या विचीत्र आणि विक्षिप्तपणासाठीही प्रसिद्ध आहे. त्याचे चोचले आणि रंगढंगांबद्धल ऐकाल तर, आश्चर्यचकीत व्हाल.
जगाची महासत्ता अमेरिकेला सतत धमक्या देणे. अण्वस्त्राचा वापर करण्यासाठी सतत तयार राहणे. जगाला तशा धमक्या देणे. तसेच, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीही मृत्यूची शिक्षा ठोणावणे, हे सर्व उद्योग करणे हा उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग याचा जणून छंदच. किंम जोंग हा त्याच्या हुकूमशाही आणि क्रुरतेमुळे जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो त्याच्या विचीत्र आणि विक्षिप्तपणासाठीही प्रसिद्ध आहे. हुकूमशाही वृत्तीमुळे आपल्या भावाला ठार मारल्याचा त्याच्यावर आरोप आहे. प्रसारमाध्यमातून त्याच्या छंदाची आणि विक्षिप्तपणाची नेहमीच चर्चा चालते. त्याचे चोचले आणि रंगढंगांबद्धल ऐकाल तर, आश्चर्यचकीत व्हाल.
आपल्याला आश्चर्य वाटेल पण, किम जोंगचा एका वर्षात केवळ दारूवर 30 मिलियन डॉलर भारतीय रूपयांमध्ये चक्क 1 अरब 93 कोटी 32 लाख रूपये इतका खर्च होतो. इतक्या पैशांची दारू तो काही एकटा नाही पित. त्याच्यासोबत त्याची चौकडीही या मद्यपाणात सहभागी असते. महत्त्वाचे म्हणजे तो अत्यंत लहरी असून, तो जी दारू पीतो तीच दारू त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या व्यक्तीलाही प्यावी लागते. त्याच्या खजीन्यात जगभरातील अत्यंत महागड्या उत्तोमोत्तम दारूचा समावेश आहे. अगदीच काहीसे खोलात सांगायचे तर, असे म्हणतात की, जगातील महागडा दारू ब्रांड हेनेसीच्या एका बॉटलची किंमत 2115 डॉलर इतकी आहे. भारतीय रूपयांमध्ये ही किंमत होते 1 लाख 38 हजार 223 रूपये 80 पैसे इतकी. आता बोला. उत्तर कोरियातील अनेक नागरिकांचे वार्षिक उत्पन्नही किमच्या दारूच्या बाटलीच्या किमतीपेक्षा कमी आहे.
शा या विक्षिप्त किमने सोल जुन हीच्यासोबत 2009 मध्ये लग्न केले. आपल्या जनतेच्या पैशांची लूट करणे हा तर, किमवर लागलेला अगदी मामूली आरोप आहे. जनतेचे कोणतेच स्वप्न पूर्ण होईल याची कोणतीच तमा न बाळगणारा हा पठ्ठा बायकोची सगळी स्वप्ने कशी पूर्ण होती याबाबत मात्र भलताच दक्ष असतो. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार आपल्या पत्नीला जगभरातील उत्तमोत्तम हॉटेल्समध्ये घेऊन जाणे हा त्याचा आवडता छंद आहे. असेही सांगितले जाते की, कोरियातील सर्वासामन्या व्यक्तीचे वार्षीक उत्पादन असते त्यापेक्षा किमची पत्नी सोल ही घराबाहेर पडताना जी हॅंडबॅग वापरते तिची किंमत जास्त असते. किमची पत्नी क्रिश्टियन डायरची हॅंडबॅग वापरते. या बॅगची किंमत कमित कमी 1457 डॉलर इतकी आहे. भारतीय रूपयांत ही किंमत 1 लाख 15 हजार 992 रूपये इतकी होते.
किम केवळ महागड्या दारूचाच शौकीन नाही. त्याला महागड्या सिगारेट ओढायचाही शौक आहे. किम फ्रेंच डिजायनर सिगारेट पितो. सिगारेट बनविणाऱ्या कंपनीचे नाव जरी घ्यायचे म्हटले तरी, अनेकांची जीभ थरथरते. या कंपनीचे नाव ईज सेंट लॉरेंट असे आहे. पण स्पेलिंग मात्र Yves असे आहे. असो. या कंपनीच्या सिगारेटच्या एका पाकिटाची रक्कम 44 डॉलर म्हणजेच भरतीय रूपयांत चक्क 2 हजार 835 रूपये 36 पैसे इतकी आहे. हे सिगारेट इतर सिगारेट सारखे नसते. त्याचे पाकिट हे लेदरपासून बनिवण्यात येते. या पाकिटाची किंमत ही त्यातील सिगारेटपेक्षा तिप्पट अधिक म्हणजेच 165 डॉलर इतकी असते. भारतीय रूपयांत ही किंमत होते 10 हजार 632 रूपये 60 पैसे.
युद्ध, मृत्यूदंड, छळ या गोष्टींमध्ये रमणाऱ्या भयानक हुकूमशाहाला चित्रपट, कला, संस्कृती आदी गोष्टींचीह भारीच आवड आहे. चित्रपटाच्या वेडापाई त्याने खास स्वत:साठी चित्रपटगृहच बांधले आहे. एक हजार इतकी या चित्रपटगृहाची आसणक्षमता आहे.
किम जोंगल डेन्मार्कच्या डुकराचे मटण, इरानच्या माशांची अंडी, जपानचेच्या प्राण्यांचे मांस आणि चीनी टरबूज खायला आवडते. तर असा आहे हा क्रुर हुकूमशाहा किम जोंग.