सिओल : संयुक्त राष्ट्र परिषदेद्वारे घालण्यात आलेल्या नव्या निर्बंधानंतर जपान आणि दक्षिण कोरियाला धमकी दिल्याच्या एक दिवसानंतरच उत्तर कोरियाने पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले.
या चाचपणीबाबत दक्षिण कोरिया आणि जपानने माहिती दिलीये. नव्या निर्बंधानंतर उत्तर कोरियाने हे परीक्षण केले. एका महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले.
दक्षिण कोरियाच्या माहितीनुसार हे क्षेपणास्त्र ३,७०० किमीपर्यंत उंचीवर गेले आणि त्यानंतर पॅसिफिक महासागरात कोसळले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले.
हे क्षेपणास्त्र जपानच्या होकाइडोवरुन ७ वाजून ४ मिनिटे ते ७ वाजून ६ मिनिटे यादरम्यानच्या वेळेत गेले. दरम्यान, या प्रक्षेपणामुळे जपानच्या नागरिकांना कोणतेही नुकसान झाले नसल्याचे जपानने म्हटलेय. याआधी उत्तर कोरियाने अमेरिका आणि जपानला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती.
North Korea missile flies over Japan, says Tokyo: AFP
— ANI (@ANI) September 15, 2017