आणि विजय मल्ल्या पैसे परत करण्याची भाषा बोलू लागला...

कर्जबुडव्या विजय माल्याभोवतीचे फास भारत सरकारनं घट्ट आवळायला सुरुवात केली आहे.

Updated: Feb 14, 2020, 09:47 PM IST

लंडन : कर्जबुडव्या विजय माल्याभोवतीचे फास भारत सरकारनं घट्ट आवळायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच आता बँकेचा सर्व पैसा परत करण्याची भाषा विजय माल्या बोलू लागला आहे. 

कोट्यवधी रुपये बुडवून इंग्लडंला पळून गेलेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणाचा निकाल, लंडन कोर्टानं राखून ठेवला आहे. त्यामुळे बँकेच्या पैशांवर मौजमजा केलेला विजय मल्या, आता त्यानं घेतलेली सर्व रक्कम बँकांना परत करण्याची भाषा बोलू लागला आहे. 

मॅचफिक्सिंगमधला आरोपी संजीव चावलाच्या भारत प्रत्यार्पणानंतर विजय माल्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तरीही सीबीआय आणि ईडीची कारवाई अयोग्य असल्याचा आरोप माल्या करतोय. 

१७ बँकांकडून भलंमोठं कर्ज घेतल्यानंतर बँकांचे ९ हजार कोटी रुपये बुडवून विजय माल्या परदेशात पळून गेला आहे. मात्र आता त्याच्या सुटकेची शक्यता संपली आहे.