पाहूनच जीव गुदमरतो! Titanic पाहण्यासाठी जाणाऱ्या पाणबुड्या आतून असतात तरी कशा? पाहा हा Video

Titan Submarine Video : साधारण 100 हून अधिक वर्षांपासून समुद्रतळाशी असणाऱ्या टायटॅनिक या अवाढव्य क्रूझचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन या पाणबुडीचा अतिशय दुर्दैवी अंत झाला. त्याआधीचा हा व्हिडीओ 

सायली पाटील | Updated: Jun 26, 2023, 11:25 AM IST
पाहूनच जीव गुदमरतो! Titanic पाहण्यासाठी जाणाऱ्या पाणबुड्या आतून असतात तरी कशा? पाहा हा Video title=
oceangate Titan submarine interiors and tour to wreck of titanic

Titan Submarine Video : शतकभरापूर्वी एका अद्वितीय प्रवासाला निघेलल्या Titanic या आलिशान आणि महाकाय अशा जहाजाला त्याच्या पहिल्याच प्रवासात जलसमाधी मिळाली आणि संपूर्ण जगासाठी हा कुतूहलाचा विषय ठरला. हिमनगाला आदळून नुकसान झालेल्या टायटॅनिक जहाजाचा झालेला अंत कोणालाही टाळता आला नाही. पण, या घटनेचे साक्षीदार होत ते जहाज नेमकं कसं होतं हे पाहण्यासाठी उत्सुकता मात्र दिवसागणिक बळावली. 

1997 मध्ये जेम्स कॅमरुन यांनी प्रचंड मेहनतीनं Titanic हा चित्रपट साकारला आणि या जहाजासोबत घडलेल्या प्रसंगांना रुपेरी पडद्यावर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पुढे काही वर्षांनंतर या जहाजाचे समुद्राच्या तळाशी असणारे अवशेष पाहण्यासाठी जाणाऱ्या उत्साहींनी पुढाकार घेत चक्क एका वेगळ्या पर्टयनाचाच पायंडा घातला पण, हा निर्णय नेमका कितपत सुरक्षित होता आणि कितपत धोक्याचा हे नुकत्याच झालेल्या विध्वंसानं लक्षात आलं. 

ओशनगेट कंपनीची पाणबुडी... 

ओशनगेट (oceangate) कंपनीच्या एका पाणबुडीतून असेच उत्साही प्रवासी टायटॅनिकच्या अवशेषांना जवळून न्याहाळण्यासाठी गेले आणि त्या पाचही जणांचा अंत झाला. पाणबुडीचेही फक्त उध्वस्त झालेले अवशेषच आढळले. या पाणबुडीचं नुकसान नेमकं कसं झालं याबाबतचे अनेक प्रश्न यानंतर उपस्थित झाले, ज्यामुळं एका व्हिडीओची You Tube वर प्रचंड चर्चा झाली. 

हेसुद्धा वाचा : Shocking Video: Titanic चे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांच्या गौप्यस्फोटानं OceanGate चं भयानक सत्य जगासमोर

Alanx El Mundo या युट्यूबरनं त्याच्या चॅनलवर साधारण 11 महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला. सात महिन्यांपूर्वी केलेल्या पाणबुडीच्या प्रवासाचाचच हा व्हिडीओ. जिथं तो ओशनगेटच्याच पाणबुडीतून  टायटॅनिकच्या रेलिंगपर्यंत जाऊन पोहोचला होता. काहीशा लंबवर्तुळाकार आणि एका टोकाला निमुळत्या होणाऱ्या या पाणबुडीच्या प्रवासाची संपूर्ण सीरिज त्यानं शेअर केली. ज्यामध्ये पाणबुडीच्या आत अंग चोरून प्रवेश करण्यापासून त्यातच्या अंतरंगांची झलक पाहता आली होती.

काहीही दिसणार नाही इतका अंशा, समोर असणाऱ्या मॉनिटरचाच उजेड, पाठीला बाक येईल अशी बैठकव्यवस्या आणि एक लहानशी खिडकी ज्यातून तुम्ही बाहेरचं पाहू शकता अशा एकंदर अंतरंगांना या युट्यूबरनं त्याच्या व्हिडीओतून दाखवलं. प्रवास सुरु झाला आणि तुमच्याआमच्या मनात पाणबुडी नेमकी कशी चालत असेल याचे पूर्वग्रहच मिटवून टाकले. इथं कोणतं कंन्सोल नाही, बरीच बटणं नाहीत. एखादा गेम खेळतो तशा कन्सोलनं ही पाणबुडी ऑपरेट होते आणि रडारवर बाहेरल परिस्थितीचा आढावा येतो हे लक्षात येतं. 

व्हिडीओतील दृश्य पाहतानाच पाणबुडीच्या आतील परिस्थितीचा आढावा घेताना आपला जीव गुदमरतो. Alanx नं दाखवलेली ही दृश्य पाहताना टायटॅनिकच्या अवशेषांपाशी गेलं असता डोळ्यांसमोर येणारं भारावणारं वास्तव अद्वितीय वाटतं खरं, पण जीव धोक्यात घालून हे अवशेष पाहण्यासाठी नेणारी ही पाणबुडी नेमकी कितपत सुरक्षित आहे हाच प्रश्न मनात चाळवतो.