कार चालवताना अचानक बेशुद्ध पडली महिला, पुढे जे घडलं ते.... पाहा व्हिडीओ

कार चालवताना अचानक हरपली महिलेची शुद्ध पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं, पाहा व्हिडीओ  

Updated: May 13, 2022, 11:24 AM IST
कार चालवताना अचानक बेशुद्ध पडली महिला, पुढे जे घडलं ते.... पाहा व्हिडीओ  title=

नवी दिल्ली : काळ आणि वेळ कधी येईल सांगता येत नाही. पण वेळ चांगली असेल तर दुर्घटनेनंतर लवकर मदतही मिळते हे देखील तेवढंच खरं आहे. एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. कार चालवत असताना अचानक महिलेची शुद्ध हरपली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

गाडी चौकात आली असताना अचानक महिला बेशुद्ध पडली. त्यामुळे मोठी आणि भीषण दुर्घटना होऊ शकली असती. पण दैव बलवत्तर म्हणून या महिलेला लवकर मदत मिळाली. 

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की सिग्नल असूनही महिलेची कार हळूहळू पुढे जाताना दिसली. रस्त्यावर असलेल्या आजूबाजूच्या लोकांनी या कारला नोटीस केलं. त्यानंतर या कारमध्ये काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. 

एका महिलेनं तातडीनं पाहिलं तेव्हा गाडी चालवणारी महिला बेशुद्ध झाल्याचं लक्ष्यात आलं. त्या महिलेनं तातडीनं मदत मागितली. आजूबाजूला लोक जमली. त्यांनी गाडीला रोखलं आणि महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. 

नशीबाने गाडीला रोखण्यात यश आलं. तर दुसरीकडे समोरून वेगात गाडी येत नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या कारला अनलॉक करून महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेचं नाव लॉरी रब्योर (Laurie Rabyor) असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना कुठे घडली आणि या महिलेबद्दल अधिक माहिती अजून तरी मिळू शकली नाही. झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही खातरजमा करत नाही.