Omicron : लहान मुलांमधील या 5 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, तात्काळ करा तपासणी

फ्लू सारख्या लक्षणांकडे पालकांनी दुर्लक्ष करु नये असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे

Updated: Dec 7, 2021, 07:45 PM IST
Omicron : लहान मुलांमधील या 5 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, तात्काळ करा तपासणी title=
संग्रहित छाया

लंडन : दक्षिण आफ्रिकेतून सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन (Omicron) या नवीन व्हेरिएंटने संपूर्ण जगात दहशत पसरली आहे. अशात आता ओमायक्रॉनबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. ओमायक्रॉन लहान मुलांनाही लक्ष्य करत आहे. दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांनंतर ब्रिटीश शास्त्रज्ञांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार 5 वर्षांखालील मुलांमध्येही हा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.

ब्रिटिश तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
UK शास्त्रज्ञ सुपर स्ट्रेन Omicron वर माहिती गोळा करत आहेत. या माहितीचा अभ्यास केल्यानंतर, असं आढळलं आहे की ओमायक्रॉनचा विषाणू मुलांना पूर्वीपेक्षा जास्त लवकर संक्रमित करू शकतो. दिलासादायक गोष्ट म्हणजे बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत.

ज्या डॉक्टरांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल सर्वात आधी माहिती दिली त्यांनी दावा केला की ओमायक्रॉनमुळे अनेक लक्षणे उद्भवू शकतात. दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अँजेलिक कोएत्झी यांच्या दाव्यानुसार ओमायक्रॉनच्या मुख्य लक्षणांमध्ये थकवा, अंगदुखी, डोकेदुखी यांचा समावेश होतो.

सहा वर्षांच्या मुलीमध्ये दिसली ही लक्षणे
डॉ. कोएत्झी यांनी सहा वर्षांच्या मुलीच्या लक्षणांबद्दल माहिती दिली आहे. मुलीला ताप होता तसंच तिच्या नाडीचा वेगही जास्त होता. प्रौढांमध्येही ही लक्षणे दिसून येत आहेत. पण आता नवीन माहितीमध्ये मुलांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांबाबत इशारा देण्यात आला आहे. अनेक रुग्ण घसा खवखवणे आणि फ्लू सारखी लक्षणे देखील नोंदवत आहेत.

मुलांमधील या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
लहान मुलांमध्ये फ्लूसारख्या लक्षणांकडे पालकांनी दुर्लक्ष करु नये. आपल्या मुलांची तात्काळ कोरोना चाचणी करुन घ्यावी असं तज्ज्ञ सांगतात. सोवेटोच्या अॅकॅडेमिक हॉस्पिटलचे डॉ रुडो माथिवा यांच्या म्हणण्यानुसार यावेळी पूर्वीपेक्षा जास्त मुलांना संसर्ग होत आहे. त्यांनी दावा केला आहे, सध्या मुलांमध्येही या विषाणुमुळे काही लक्षणे दिसू लागली आहेत. तज्ज्ञांनी पालकांना या पाच लक्षणांबद्दल सावध केलं आहे 

1. थकवा
2. डोकेदुखी
3. ताप
4. घसा खवखवणे
5. भूक कमी लागणे