Optical Illusion Quiz : सोशल मीडियावर आजकाल आपण विविध प्रकराची कोडी किंवा गेम खेळत असतो. यामध्ये तुम्हाला एखादा फोटो दिला जातो, आणि त्यामध्ये लपलेली गोष्ट शोधायची असते. याशिवाय एखाद्या फोटोमध्ये असलेली चूक शोधण्याचं टास्क आपल्याला दिलं जातं. आम्ही आज तुमच्यासाठी असंच एक कोडं घेऊन आलो आहोत. या Optical Illusion मध्ये तुम्हाला फोटोमध्ये दिलेली चूक शोधून दाखवायची आहे.
आम्ही दिलेल्या फोटोमध्ये चूक शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदांची वेळ आहे. जर या 10 सेकंदात तुम्ही ही चूक शोधली तर तुम्ही जिनियस आहात.
तुमच्या समोर आता जो फोटो आहे, त्यामध्ये तुम्हाला एक घड्याळ दिसत असेल. याच फोटोमध्ये ही चूक आहे आणि ही चूक तुम्हाला अवघ्या 10 सेकंदामध्ये शोधायची आहे.
जर तुम्ही हे चॅलेंज पूर्ण केलं असेल तर तुम्ही खरंच खूप जिनियस आहात. कारण तुमच्या नजरेतून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. मात्र जर तुम्ही या फोटोतील चूक अजूनही शोधू शकला नसाल तर हरकत नाही. यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू.
आता तुमच्यापैकी काही जणांना वाटेल की, या फोटोमध्ये काहीही चूक नाहीये. मात्र जर तुम्ही हा फोटो नीट निरखून पाहिलात तर तुम्हाला समजेल की चूक ही नंबरमध्ये आहे. फोटोतील या घडाळ्यामध्ये जिथे 9 (IX) असं पाहिजे तिथे 11 (XI) लिहिलेलं आहे. तर याउलट जिथे 11 अंक पाहिजे तिथे 9 लिहिलेलं आहे. आता तुमच्या लक्षात येईल, की फोटोमध्ये चूक काय आहे.