Optical Illusion : 'या' फोटोमध्ये तुम्हाला कोणता प्राणी दिसतोय? पाहा तुमचा मेंदू कसा काम करतो?

Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो तुमच्या डोक्याचा अगदी भुगा करतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काहींना यामध्ये प्राणी दिसून येतोय तर काहींना उभ्या आणि आडव्या रेषांविषयी काहीच दिसत नाहीये.

| Updated: Jul 9, 2023, 12:37 PM IST
Optical Illusion : 'या' फोटोमध्ये तुम्हाला कोणता प्राणी दिसतोय? पाहा तुमचा मेंदू कसा काम करतो? title=

Optical Illusion : तुम्हीही इंटरनेटवर खूप एक्टिव्ह असता का? तर तुम्हालाही सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजन ( optical illusion ) चे फोटो दिसून येतील. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो तुमच्या डोक्याचा अगदी भुगा करतात. या फोटोमध्ये आपल्याला लपलेल्या गोष्टी किंवा कोडी सोडवावी लागतात. या फोटोंवर तुमचा मेंदू आणि डोळे किती तीक्ष्ण आहेत, हे तपासलं जातं.

नुकतंच असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये मांजर किंवा हरिण दिसत असल्याचा अनेकांचा दावा आहे. काहींना यामध्ये प्राणी दिसून येतोय तर काहींना उभ्या आणि आडव्या रेषांविषयी काहीच दिसत नाहीये. तुम्हाला या फोटोमध्ये काय दिसून येतंय?

ट्विटरच्या माध्यमातून हा फोटो व्हायरल होताना दिसतोय. ट्विटरवर @PamelaApostolo1 नावाच्या युझरने तो शेअर केलाय. या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, 'तुमचा मेंदू (उजवा किंवा डावा मेंदू) कसा काम करतो हे यावर अवलंबून आहे. या पॅटर्नमध्ये तुम्ही मांजर किंवा मूस (हरणाचा एक प्रकार) देखील पाहू शकता." 

सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की, तुम्ही जो प्राणी पहात आहात तो या चित्राचा भाग नाही, तो फक्त तुमच्या मनाने निर्माण केलेला एक दृष्टीचा भ्रम आहे, असंही या कॅप्शनमध्ये दिसून येतंय.

या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसून येतंय?

जर तुम्ही हा फोटो पाहिलात तर उभ्या आणि आडव्या रेषांव्यतिरीक्त तुम्हाला काहीही दिसणार नाही. मात्र आता डोळे थोडे बारीक करा आणि हा फोटो पहा. कदाचित आता तुम्हाला एखादी मांजर किंवा हरिण दिसून येत असेल. डोळे पूर्ववत केल्यानंतर पुन्हा रेषा दिसू लागतील. हाच या फोटोमधील खरा भ्रम आहे.