Shocking! पार्कात फिरणाऱ्या महिलेवर 100हून अधिक उंदरांचा हल्ला

आपल्यासोबत नेमंक काय घडतंय, हेच महिलेला कळत नव्हतं?

Updated: Jul 26, 2021, 10:03 AM IST
Shocking! पार्कात फिरणाऱ्या महिलेवर 100हून अधिक उंदरांचा हल्ला

मुंबई : पार्कात फिरणाऱ्या महिलेवर एक दोन नव्हे तब्बल शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला ही अतिशय धक्कादायक बाब आहे. ही बातमी वाचल्यावरच, असं कसं? तर रात्रीच्या वेळी पार्कात फिरणाऱ्या महिलेवर तब्बल शंभर उंदरांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला जखमी झाली आहे. या घटनेनंतर महिला अतिशय घाबरलेली आहे. एवढंच नव्हे तर या महिलेने रात्री पार्कात शतपावली न करण्याचा सल्ला इतरांना दिला आहे. 

ब्रिटनमधील एका महिलेचा असा दावा आहे की, पार्कात रात्रीत फिरत असताना तिच्यावर उंदरांनी हल्ला केला. 'द सन'मध्ये छापून आलेल्या बातमीनुसार, लंडनमध्ये राहणाऱ्या 43 वर्षीय सुसान ट्रेफ्टब (Susan Treftub)19 जुलै रोजी रात्री 9 वाजता जवळच्या नॉर्थफील्ड्स, ईलिंगमधील ब्लोंडिन पार्कमध्ये फिरत होती. तेव्हा तिचं लक्ष गवतात फिरणाऱ्या शेकडो उंदरांकडे गेली. एकाचवेळी एवढे उंदिर बघून ती घाबरली. ती तेथून निघेल तेवढ्यातच उंदरांनी त्यांच्यावर हल्ला केला. 

सुसान म्हणाला, 'मी इतके उंदीर एकाच वेळी कधीच पाहिले नव्हते. ते 100 पेक्षा जास्त उंदीर होते. मला असे वाटले की मी आजारी पडणार आहे. माझ्या पायावर उंदीर रेंगाळत होते. मी त्यांना लाथ मारत होते. अंधारामुळे उंदीर कुठून येत आहेत हे पाहणे कठीण होते. ती पुढे म्हणाले की, उंदीर माझ्या पायाला कुरतडत होते आणि माझ्या शरीरावर चढण्याचा प्रयत्न करीत होते.

उंदर बरेच ठिकाणी चावले 

सुसानच्या म्हणण्यानुसार, उंदरांनी तिच्या हात पायांना अनेक ठिकाणी चावले. तरीसुद्धा तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताच्या दिवशी मी कोणाकडून मदत घ्यावी हे मला समजू शकले नाही असे ती म्हणाली. या प्रकाराच्या हल्ल्याबद्दल मी कुणाला बोलताना ऐकले नव्हते. मला सर्वांना सांगायचे आहे की रात्रीच्या वेळी पार्कसारख्या ठिकाणी जाणे टाळा.

त्याच वेळी, इलिंग कौन्सिलच्या प्रवक्त्याने सांगितले की उंदीर आणि इतर शक्य कीटकांच्या प्रजातींचा असा हल्ला धक्कादायक आहे. त्यांनी सांगितले की, उद्यानांमधील घाण व उरलेले अन्न इत्यादी जनावरांसाठी असल्याने उंदीर सहसा उद्यानात येतात. म्हणूनच लोकांनी खाद्यपदार्थ इकडे तिकडे फेकू नयेत कारण उरलेले अन्न देखील उंदीरांना आकर्षित करते.