करतारपूर परिसरामध्येही पाकिस्तानकडून भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न

...असं ठळक अक्षरांमध्ये लिहिण्यात आलं आहे. 

Updated: Nov 8, 2019, 04:01 PM IST
करतारपूर परिसरामध्येही पाकिस्तानकडून भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : पाकिस्तानमधील करतारपूर साहेब गुरुद्वारा परिसरामध्ये पाकिस्तानकडून एक बॉम्ब ठेवण्यात आला आहे. या बॉम्बशेजारीच एक फलक लावण्यात आलं आहे. ज्यावर 'मिरॅकल ऑफ वाहेगुरुजी' म्हणजेच वाहेगुरुंचा चमत्कार असं ठळक अक्षरांमध्ये लिहिण्यात आलं आहे. ज्यामुळे आता नवा वाद समोर आला आहे. 

एका ठोकळ्यावर हा बॉम्ब प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. भारतीयांना डिवचण्याच्या छुप्या हेतूने ठेवण्यात आलेल्या या बॉम्बशेजारी लावण्यात आलेल्या या फलकावर तो बॉम्ब केव्हा आणि कधी टाकण्यात आला होता, याविषयीची माहितीही लिहिण्यात आली आहे. 'भारतीय वायुदलाकडून १९७१ मध्ये झालेल्या युद्धादरम्यान गुरुद्वारा साहेब श्री करतारपूर साहेब उध्वस्त करण्याच्या हेतूने हा बॉम्ब टाकण्यात आला होता. अखेर हे कृत्य यशस्वी ठरलं नाही. हे वाहेगुरुंच्या कृपेमुळेच झालं होतं.  त्यांच्याकडून टाकण्यात आलेला बॉम्ब हा श्री खू साहेबमध्ये (पवित्र विहिरीत) पडला होता. ज्यामुळे श्री दरबार साहेब सुखरुप राहिलं होतं', असं त्या फलकावर लिहिण्यात आलं असल्याचं म्हटलं जात आहे.  

width: 1030px; height: 1138px;

ही तिच विहिर होती ज्यातील पाणी खुद्द श्री गुरुनानक देव जी त्यांच्या शेतांमध्ये वापरत असत, असंही त्या फलकावर स्पष्ट करण्यात आलं आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात सणाऱ्या या अपवित्र स्थळाला भेट देण्यासाठी भाविकांची रिघ लागण्यापूर्वी ही माहिती समोर येत आहे. त्यामुळे धार्मिक यात्रेच्या नावाखालीही पाकिस्तानची ही चाल अनेकांनाच खटकत आहे. दरम्यान, गुरुवारी पाकिस्तान सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या  एका व्हिडिओवर भारताकडून हरकत व्यक्त करण्यात आली होती. 

खलिस्तानची मागणी करणारे फुटिरतावादी जरनेलसिंग भिंदरवाले यांची छायाचित्र या व्हिडिओमध्ये दिसत असल्यामुळे ही हरकत घेण्यात आली होती. यातून पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कुरापती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही पाकिस्तानच्या या व्हिडिओचा निषेध करत करतारपूर कॉरिडोर Kartarpur corridor सुरु करण्यामागे पाकिस्तानचा छुपा हेतू असल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली.